`Period Cramps फक्त मुंबई- दिल्लीच्या मुलींना येतात, इतरांना...`; गोविंदाच्या लेकीचं वादग्रस्त वक्तव्य
Govinda`s Daughter on Period Cramps : गोविंदाच्या लेकीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मुंबई आणि दिल्लीच्याच मुलींना Period Cramps येतात असं म्हटलं आहे.
Govinda's Daughter on Period Cramps : बॉलिवूड अभिनेता गोविंदाची लेक टीना ही देखील तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. आता तिचं चर्चेत असण्याचं कारण तिनं महिलांच्या मासिकपाळीच्या वेळी होणाऱ्या त्रासावर किंवा क्रॅम्प्सवर वक्तव्य केलं आहे. टीनानं आई सुनीतासोबत नुकतीच मुलाखत दिली. त्या मुलाखतीत तिनं महिलांच्या मासिकपाळीच्या क्रॅम्प्सवर वक्तव्य केलं आहे.
टीनानं ही मुलाखत 'हॉटरफ्लाई' ला दिली होती. या मुलाखतीत पीरियेड्सविषयी बोलत असताना दावा केला की मासिक पाळीत जे क्रॅम्प्स होतात ते फक्त मुंबई आणि दिल्लीसारख्या शहरात राहणाऱ्या मुलींना होतात. इतर शहरात राहणाऱ्या महिलांना कोणत्याच गोष्टीचा त्रास होत नाही. टीना म्हणाली, "मी जास्तकरून चंडीगढमध्ये राहिले आणि मी फक्त मुंबई आणि दिल्लीच्या मुलींना क्रॅम्पविषयी बोलताना ऐकलं आहे. अर्ध्या समस्या या फक्त त्या सर्कल्सला सेट केल्यामुळे येतात कारण तेच लोकं क्रॅम्पविषयी वगैरे बोलतात. त्यामुळे ज्यांना याविषयी काही त्रास होत नाही त्यांना देखील अशा समस्या जाणवू लागतात. पंजाब आणि इतर छोट्या शहरांमधील महिलांना कळतही नाही की कधी त्यांना मासिकपाळी येते आणि कधी मेनोपॉज. त्यांना काहीच जाणवत नाही.'
त्यानंतर मासिक पाळीत होणाऱ्या क्रॅम्प्स किंवा इतर गोष्टींसाठी महिलांचं जेवण आणि त्यांच्या वाईट सवयी जबाबदार आहेत. टीनानं सांगितलं की "माझं शरीर देशी आहे. मला कधीच पाठी दुखी किंवा क्रॅम्पची समस्या झाली नाही. पण, इथल्या मुलींना मी कायम क्रॅम्पविषयी बोलताना ऐकते. तुम्ही तूप खा, तुमचा आहार चांगला ठेवा, गरज नसताना डायट करु नका, छान झोपा आणि हळू-हळू सगळ्या गोष्टी या सामान्य होतील. अनेक मुलींना ही समस्या डायटिंगमुळे होते."
हेही वाचा : आई-वडील आणि नवरा सुपरस्टार, तिन्ही खानसोबत केलं काम: आज अभिनेत्री नाही तर लेखिका म्हणून ओळख
पुढे टीनाचं हे वक्तव्य ऐकताच सुनीतानं तिच्या मुलीच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत सांगितलं की "सगळ्यांनी त्यांच्या आहारावर लक्ष देणं महत्त्वाचं आहे. कधीही आहारात कोणत्याही नवीन गोष्टीचा सामना करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यानं म्हटलं की नंतर मला हे सांगून दोष देऊ नका की गोविंदाची पत्नी सुनीतानं एक चमचा तूप खाण्यास सांगितलं आणि हृदयात त्यामुळे ब्लॉकेज आलं आहे."