Govinda's Wife Converted to Christianity : बॉलिवूड अभिनेता गोविंदानं 1987 मध्ये सुनीता आहूजाशी लग्न केलं. या दोघांच्या लग्नाला जवळपास 40 वर्षांपेक्षा अधिक काळ झाला आहे. सुनीता या शोबजपासून लांब असून त्या त्यांच्या मोकळेपणासाठी आणि स्पष्ट वक्तव्यांसाठी ओळखल्या जातात. त्यांच्या मनात जे काही आहे त्या सरळ बोलतात. त्या अनेकदा गोविंदासोबत वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये दिसतात. सुनीता या पंजाबी आणि अर्ध्या नेपाळी कुटुंबातून येतात. मात्र, त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. एका मुलाखतीत त्यांनी धर्म परिवर्तन करण्याचं कारण सांगितलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुनीता आहूजा यांनी 'टाइमआउट विद अंकित' या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी त्यांच्या आणि गोविंदाचं बालपण त्यांची लव्ह स्टोरी आणि लग्नानंतरच्या आयुष्याविषयी सांगितलं. त्यावेळी त्यांनी एक अशी घटना सांगितली ज्यात त्यांनी एका ख्रिश्चन शाळेत शिक्षण घेतलं आणि एक दिवस आई-वडिलांना न सांगता त्यांनी गुपचूप ख्रिश्चन धर्म स्वीकारला. आता धर्म परिवर्तन करण्याचं कारण त्यांना थोडी वाईन मिळेल हे असल्याचं त्यांनी सांगितलं. 



सुनीता यांनी सांगितलं की 'माझा जन्म वांद्रेमध्ये झाला. माझं बॅप्टिझम झालं आहे. मी एका ख्रिश्चन शाळेत होते आणि माझे सगळे मित्र-मैत्रिण हे ख्रिश्चन होते. लहाण असताना मी ऐकलं होतं की येशूच्या रक्तात वाईन आहे आणि विचार केला की वाईनचा अर्थ दारू आहे. मी आधीपासून चतूर होते. दारू पिण्यात काही चूक नाही, फक्त थोडी दारू पिण्यासाठी मी धर्मपरिवर्तन केलं.'


सुनीतानं सांगितलं की 'त्या अजूनही ख्रिश्चन धर्माचं पालन करतात आणि शनिवारी चर्चला जातात.' त्यानंतर त्यांना विचारण्यात आलं की 'त्यांच्या आई-वडिलांना हे पटल नव्हतं.' त्यावर उत्तर देत सुनीता म्हणाल्या, 'त्यांना त्याविषयी कधीच माहित झालं नाही. त्याशिवाय त्यांनी पुढे सांगितलं की त्या दरगाह, गुरुद्वारा आणि मंदिरांमध्ये जातात.' 


हेही वाचा : आज जर बाळासाहेब आणि आनंद दिघेंचा फोन आला तर काय सांगाल? Dharmaveer 2 च्या टीमची अशी होती प्रतिक्रिया


दरम्यान, पुढे सुनीता यांनी त्यांच्या आणि गोविंदामध्ये असलेल्या संस्कृतीवरून झालेल्या मतभेदांविषयी सांगितलं. त्यांनी सांगितलं की त्या वांद्रे परिसरात रहायच्या आणि त्यावेळी तो उच्चभ्रू लोकांच्या वस्ती म्हणून ओळखला जायचा. तर गोविंदा विरारमध्ये राहायचा. त्यामुळे त्याला सुनीता यांनी मिनी स्कर्ट परिधान करणं आवडत नव्हतं आणि तो म्हणायचा की आईला देखील ते आवडणार नाही. त्यामुळे सुनीता यांनी गोविंदाच्या आईसाठी साडी नेसायला सुरुवात केली.