सलमानच्या बहिणीच्या प्रेमात होता गोविंदा; तिनं केव्हाच ओलांडलीये पन्नाशी
![सलमानच्या बहिणीच्या प्रेमात होता गोविंदा; तिनं केव्हाच ओलांडलीये पन्नाशी सलमानच्या बहिणीच्या प्रेमात होता गोविंदा; तिनं केव्हाच ओलांडलीये पन्नाशी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_500x286/public/2021/11/09/457385-jmhfdsbvjmf.png?itok=xUCgvHWl)
आईमुळं आलेला नात्यात अडथळा...
मुंबई : अभिनेता सलमान खान आणि त्याच्या कुटुंबाची सर्वदूर चर्चा होते. आता सलमानच्या कुटुंबाची वेगळ्यानं ओळख करुन देण्याची गरज नाही. असं असलं तरीही त्याच्या कुटुंबातील काही व्यक्ती मात्र झगमगाटापासून दूरच आहेत.
सलमानच्या अशाच एका कुटुंबातील त्याची बहीण अचानकच चर्चेत आली आहे. त्याचं हे कुटुंब म्हणजे 'हम साथ साथ है' चित्रपटातील सर्वाची मनं जिंकलेलं कुटुंब. या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेलं कुटुंब प्रत्येकालाच आपलंसं वाटलं. सोबतच त्यातील कलाकारही.
इथं चर्चा सुरु आहे सलमानच्या ऑनस्क्रीन बहिणीची. चित्रपटात सलमानच्या बहिणीची भूमिका साकारली होती, अभिनेत्री नीलम कोठारी हिने. नीलमचं नाव कारकिर्दीदरम्यान अभिनेता गोविंदाशी जोडलं गेलं होतं. चित्रपट कारकिर्दीत या दोघांनी 10 चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. सूत्रांच्या माहितीनुसार नीलम आणि गोविंदा यांचं नातं बरीच वर्षे चाललं.
गोविंदा नीलमच्या प्रेमात पुरते बुडाला होता. इतकंच नव्हे तर, सुनीताशी झालेला साखरपुडाही तो मोडू इच्छित होता अशी माहिती समोर येत आहे. पण, गोविंदाच्या आईची नीलमला पसंती नव्हती. त्यानं सुनीताशीच लग्न करावं असं त्यांना वाटत होतं. ज्यामुळंच गोविंदा आणि नीलम यांच्यात दुरावा आला आणि या दोघांनीही वेगळ्या वाटा निवडल्या.