मुंबई : हिंदी कलाविश्वात काही वर्षे प्रसिद्धीझोतात आल्यानंतर अभिनेत्री Priyanka Chopra प्रियांका चोप्रा हिने तिचा मोर्चा परदेशात वळवला. पाहता पाहता ती परदेशी कलाविश्वात चांगलीच स्थिरावलीय हॉलिवूड वर्तुळातही तिची चर्चा सुरु झाली. आंतरराष्ट्रीय पातळीवर पार पडणाऱ्या अनेक कार्यक्रमांमध्ये असणारी प्रियांकाची उपस्थितीही अनेकांना थक्क करणारीच. पण, अशी ही 'देसी गर्ल', तिच्या स्टाईल स्टेटमेंटसाठी नेटकऱ्यांच्या रोषाचा सामना करत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियांकाने कायमच रेड कार्पेटवर येतेवेळी काही हटके लुकला पसंती दिली आहे. मेट गालाच्या वेळी तिच्या या लुकची प्रतिची आली. पण, Grammys 2020 ग्रॅमी २०२०च्या सोहळ्यानिमित्ताने सर्वांसमक्ष आलेल्या प्रियांकाने मात्र काहींच्या निराशाजनक प्रतिक्रिया ओढवल्या. 


पती निक जोनास याच्यासोबत ग्रॅमीच्या निमित्ताने प्रियांका दिसली. यावेळी, तिने पांढऱ्या रंगाचा, लो नेकलाईन गाऊन घातला होता. पण, तिच्या ड्रेसला हायलाईट करणारी हीच नेकलाईन अनेकांना खटकली. लो नेकलाईन प्रमाणाहून जास्त डीप लो असल्याची बाब हेरत अनेकांनीच प्रियांकाच्या या बोल्ड लूकवर नाराजी व्यक्त केली. 



वाचा : विराट कोहलीच्या आलिशान हॉटेलमध्ये मिळतात अफलातून पदार्थ


फक्त नाराजी आणि खिल्ली उडवणंच नव्हे, तर आता हेच बाकी ठेवलं होतं.... अशी खोचक प्रतिक्रिया देत काही नेटकऱ्यांनी प्रियांकाच्या या स्टाईल स्टेटमेंटवर संताप व्यक्त केला. तुझ्या स्टाईल स्टेटमेंटला हे काय झालं गं... असं म्हणत कोणी देसी गर्लला प्रश्न केला. तर, कोणी तिच्यावर असणारं प्रेम व्यक्त करत, हा लूक मात्र आपल्याला पटला नसल्याची खरी प्रतिक्रिया दिली.