Guess Who :  सोशल मीडियावर स्टार्सचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत स्टार्सचे काही फोटो लहाणपणीचे (starkids childhood photo) असतात, तर काही प्रौढ अवस्थेतले फोटो असतात. असाच एक फोटो आता समोर आला आहे. या फोटोतील बॉलिवूड अभिनेत्रीला (Bollywood Actress) तुम्हाला ओळखायचे आहे. बॉलिवूड अभिनेत्रीचा हा लहाणपणीचा फोटो आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हाला ही अभिनेत्री ओळखायची आहे. 


फोटोत काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फोटोत तुम्ही पाहू शकता, एक मुलगी उभी आहे.तिचे वय साधारण 4-5 वर्ष असेल. हा तिचा शाळेतला फोटो आहे. ज्यामध्ये तिला कप मिळाला आहे. शाळेतली एखादी स्पर्धा तिने जिंकली होती,यासाठी तिला ते पारीतोषिक देण्यात आले आहे.ही मुलगी आता मोठी होऊन बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री बनली आहे. या अभिनेत्रीचे चित्रपट प्रेक्षकांना आवडतात.या अभिनेत्रीला तुम्हाला ओळखायचे आहे.


कोण आहे ही अभिनेत्री?


ही बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. तिने बॉलिवूडच्या अनेक हिट चित्रपटात काम केले आहे. तिचे अनेक चित्रपट गाजले आहे. तिचा पती देखील बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता आहे. दोघांनी मिळून काही ऐतिहासिक सिनेमे देखील केले आहेत. तसेच अभिनेत्रीच्या पतीने नुकताच न्यूड फोटोशूट देखील केला होता. या फोटोशूटने सोशल मीडियावर धुमाकुळ घातला होता.


ही आहे अभिनेत्री?


ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ब़ॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदूकोन आहे. तिचा हा लहाणपणीचा फोटो आहे.तिने शाहरूख खान, रणवीर कपूर, सैफ अली खान आणि रणवीर सिंह सारख्या दिग्गज अभिनेत्यासोबत काम केले आहे. तसेच तिने रणवीर सिंह सोबत 14 नोव्हेंवर 2018 रोजी लग्न केले होते्. या लग्नाच्या काही वर्षानंतर रणवीर सिंहने न्यूड फोटो शूट केला होता. या फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा रंगली होती. 


दिपिका पदूकोनने आतापर्यंत गेहराईया, छपाक, पिकू, बाजीराव मस्तानी, ये जवानी है दिवानी है यासारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे. तसेच ती शाहरूख खानसोबत पठाण चित्रपटात देखील दिसणार आहे. या चित्रपटातील तिच्या भगव्या बिकनीवरून मोठा वाद झाला होता.सध्या या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.