Guess Who : फोटोतल्या `या` बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलंत का?
Guess Who : या फोटोतील बॉलिवूड अभिनेत्रीला (Bollywood Actress) तुम्हाला ओळखायचे आहे. बॉलिवूड अभिनेत्रीचा हा लहाणपणीचा फोटो आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हाला ही अभिनेत्री ओळखायची आहे.
Guess Who : सोशल मीडियावर स्टार्सचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत स्टार्सचे काही फोटो लहाणपणीचे (starkids childhood photo) असतात, तर काही प्रौढ अवस्थेतले फोटो असतात. असाच एक फोटो आता समोर आला आहे. या फोटोतील बॉलिवूड अभिनेत्रीला (Bollywood Actress) तुम्हाला ओळखायचे आहे. बॉलिवूड अभिनेत्रीचा हा लहाणपणीचा फोटो आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हाला ही अभिनेत्री ओळखायची आहे.
फोटोत काय?
फोटोत तुम्ही पाहू शकता एक मुलगी दिसत आहे. ही मुलगी दिसायला खुपच सुंदर दिसत आहे. तिने केसात फुले घातली आहेत, तर गळ्यात काही नेकलेस घातले आहेत. या लुकमध्ये ती खुपच सुंदर दिसत आहेत. ही मुलगी मोठी होऊन बॉलिवूडची अभिनेत्री (Bollywood Actress) झाली आहे. तिने अनेक अभिनेत्यांसोबत काम केले आहे.तसेच तिचे अनेक चित्रपट हिट ठरले आहेत.
कोण आहे अभिनेत्री?
वयाच्या 14 व्या वर्षी तिने चित्रपटांमध्ये पदार्पण केले. तिचे सौंदर्य आणि डान्स पाहून तिच्याकडे चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या आहेत. साऊथच्या चित्रपटांमध्ये नाव कमावल्यानंतर ती बॉलीवूड चित्रपटांकडे वळली आणि तिला खूप प्रसिद्धीही मिळाली. तिने बॉलिुवूडचा दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan),धर्मेंद्र आणि जॅकी श्रॉफसोबत सिनेमात काम केले आहे. ब़ॉलिवूडमध्ये तिचे अनेक सिनेमे हिट ठरले आहेत. सिनेमात काम केल्यांनंतर तिने राजकारणातही प्रवेश केला होता.ती एक खासदार देखील आहे. सध्या ती जनेतेचे प्रश्न सोडवतेय.
'ही' आहे ती अभिनेत्री?
जर तुम्ही अजून देखील ओळखू शकला नसाल, तर आम्ही तुम्हाला सांगतो ही अभिनेत्री बॉलिवूडची जया प्रदा (jaya prada)आहे. जयाने तिच्या काळातील जवळपास सर्वच मोठ्या स्टार्ससोबत नायिका म्हणून चित्रपटांमध्ये काम केले.जरी ती इंडस्ट्री सोडून राजकारणात दिसली असली तरी तिची फॅन फॉलोइंग अजिबात कमी झालेली नाही. ती अजूनही खूप सुंदर दिसते. अलीकडेच जयाप्रदा (jaya prada)हिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.
दरम्यान जयाप्रदाने (jaya prada) सरगम', 'मा', 'घर घर की कहानी', 'तुफान', 'स्वर्ग से सुंदर', 'संजोग', 'मुद्दत', 'सिंदूर', 'जबरदस्त','जख्मी', 'गंगा तेरे देश में', 'कामचोर', 'आवाज', 'पाताळ भैरवी', 'सपनो का मंदिर' सारखे अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.