Guess Who :  सोशल मीडियावर स्टार्सचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत स्टार्सचे काही फोटो लहाणपणीचे (starkids childhood photo) असतात, तर काही प्रौढ अवस्थेतले फोटो असतात. असाच एक फोटो आता समोर आला आहे. या फोटोतील बॉलिवूड अभिनेत्याला (Bollywood Actor) तुम्हाला ओळखायचे आहे. बॉलिवूड अभिनेत्याचा हा लहाणपणीचा फोटो आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हाला हा अभिनेता ओळखायचा आहे.  


फोटोत काय? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल झालेल्या फोटोत बॉलिवूडची (Bollywood Actor) दिग्गज अभिनेत्री रेखा दिसत आहे. फोटोवर रेखाच्या मांडीवर एक चिमुकला बसला आहे. हा चिमुकला बॉलिवूडचा मोठा स्टार आहे. त्याने अनेक सिनेमात काम केले आहे. 


फोटोतल्या चिमुकल्याने लहानपणापासूनच चित्रपटात काम करायला सुरुवात केली होती. मोठा झाल्यानंतर तो रोमान्सचा बादशाह ठरला होता. चॉकलेट बॉयची त्याची इमेज आहे. आपल्या निळ्या डोळ्यांनी तो मुलींना घायाळ करायचा. त्यामुळे शाहरूख पेक्षा जास्त तरूणी त्याच्या प्रेमात होत्या.  


दरम्यान जर अजूनही तुम्ही या अभिनेत्याला ओळखू शकला नसाल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की, हा (Bollywood Actor) अभिनेता जुगल हंसराज आहे. त्याने अनेक चित्रपटात काम केले नसले तरी लोकांच्या मनात एक वेगळी ओळख निर्माण करण्यात तो यशस्वी ठरला आहे. जुगल हंसराज यांनी लहानपणापासून अभिनयाला सुरुवात केली होती. बालकलाकार म्हणूनही त्यांनी अनेक चित्रपट केले आहेत. मात्र, आता जुगल फिल्मी दुनियेपासून पूर्णपणे दूर आहे. 


दरम्यान जुगलने 2014 मध्ये त्याची दीर्घकाळाची मैत्रीण जस्मिनसोबत लग्न करून लाखो मुलींची मने तोडली होती. जुगल चित्रपटांमध्ये सक्रिय नसला तरी सोशल मीडियावर तो खूप सक्रिय दिसतो.