मुंबई : सोशल मीडियावर स्टार्सचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत स्टार्सचे काही फोटो लहाणपणीचे (starkids childhood photo) असतात, तर काही प्रौढ अवस्थेतले फोटो असतात. असाच एक फोटो आता समोर आला आहे. या फोटोतील बॉलिवूड अभिनेत्रीला (Bollywood Actress) तुम्हाला ओळखायचे आहे. बॉलिवूड अभिनेत्रीचा हा लहाणपणीचा फोटो आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हाला ही अभिनेता ओळखायची आहे. 


फोटोत काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फोटोत तुम्ही पाहू शकता लग्न सोहळ्याचे वातावरण आहे. बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूर (rishi kapoor) आणि बॉलिवूड अभिनेत्री नीतू कपूरचे (neetu kapoor) लग्न होत आहे. या लग्न सोहळ्यातील रिसेप्शनमध्ये एक मुलगी दिसत आहे. या मुलीला सर्कल देखील केला आहे. ही अभिनेत्री आता मोठी होऊन बॉलिवूडची अभिनेत्री बनली आहे. तिने बॉलिवूडच्या अनेक सिनेमात काम केले आहे.


या अभिनेत्रीने यश स्टारर केजीएफ 2 (kgf 2) सिनेमात काम केले आहे. या सिनेमातील तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची खुप दाद मिळाली होती. आता या सिनेमाच्या तिसऱ्या भागातही ती दिसणार असल्याची माहिती आहे.  


फोटोत दिसणारी मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन (raveena tandon) आहे. रवीना ही 90 च्या दशकातील टॉपची हिरोईन होती. आजही रवीना (raveena tandon)  एकामागून एक सुपरहिट चित्रपट देत आहे. रवीना टंडन शेवटची KGF Chapter 2 या चित्रपटात दिसली होती.


दरम्यान जिथे 90 च्या दशकातील अनेक अभिनेत्री चित्रपटांपासून दूर गेल्या आहेत, तिथे ती अजूनही चित्रपटात झळकताना दिसत आहे. आता तिच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.