मुंबई : अनेक वेळा स्टार्सच्या बालपणीचे असे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. ज्यामध्ये आपल्याला त्यांना ओळखण्यासाठी डोक्यावर खूप भर द्यावा लागतो.  अशाच एका गोंडस चिमुरडीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून जाणून घ्या कोण आहे ही अभिनेत्री.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खांद्यावर बसलेली दिसत आहे
व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये ही गोंडस मुलगी एका व्यक्तीच्या खांद्यावर बसलेली दिसत आहे. या मुलीने हातात ड्रिंक धरलं आहे आणि या व्यक्तीच्या खांद्यावर बसून ती ते ड्रिंक घेत आहे. हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र या मुलीला ओळखणं सर्वांनाच अवघड जात आहे. तुम्ही या अभिनेत्री ओळखू शकता का?


जाणून घ्या कोण आहे ही अभिनेत्री
जर तुम्ही या मुलीला ओळखण्यात अपूर्ण पडला असाल  किंवा तुम्हाला तिला ओळखण्यात अडचण येत असेल तर अजिबात काळजी करू नका. आम्ही तुम्हाला या व्हायरल फोटोमध्ये उपस्थित असलेल्या मुलीबद्दल सांगणार आहोत. खरं तर ही मुलगी दुसरी कोणी नसून बंगाली अभिनेत्री टीएमसी खासदार नुसरत जहाँ आहेत. 



नुसरत जहाँ यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'माझा पहिला हिरो.. माझे वडील.. फादर्स डेच्या शुभेच्छा. खरं तर, या फोटोत नुसरत ज्या व्यक्तीच्या खांद्यावर बसली आहे ते दुसरे कोणीही नसून नुसरत जहाँ यांचे वडील आहेत.