मुंबई : 'गली बॉय' सिनेमाचे वारे जगभरात वाहू लागले आहे. 'आपना टाइम आयेगा' गण्याने चांगलाच जोर पकडला आहे एवढेच नाही तर सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे. ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी ट्विट केलेल्या पोस्टमध्ये पहिल्या दिवशी सिनेमाचा चढता क्रम दिसत आहे. सिनेमाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी १९ कोटींचा गल्ला जमवला तर दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर कमाईचा आकडा घसल्याचे दिसत आहे. प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी सिनेमाने १३.१० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट स्टारर सिनेमा 'गली बॉय'ने चाहत्यांची आणि समीक्षकांची मने जिंकली आहेत. हॉलिवूड स्टार विल स्मिथने सुद्धा रणवीरवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 'गली बॉय' सिनेमाने चाहत्यांच्या मनावर वेगळीच जादू केली आहे. सिनेमाने जगभरात आपला प्रभाव पाडला आहे. स्मिथने 'गली बॉय' सिनेमा पाहिल्या नंतर रणवीरचे कौतुक केले, सोशल मीडियावर त्याने एक व्हिडिओ शेअर करत सिनेमाची प्रशंसा केली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.



 


याआधी स्मिथने 'स्टूडेंट ऑफ द ईयर' सिनेमाचे दिग्दर्शक करण जोहरचे सुध्दा कौतुक केले होते. सिनेमात मुंबईच्या झोपडीत राहणाऱ्या स्ट्रिट रॅपरच्या आयुष्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. सिनेमात रणवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसत असून आलिया भट्ट त्याच्या प्रेयसीची भूमिका साकारताना दिसत आहे. ९ फेब्रुवारी रोजी 'गली बॉय' सिनेमाचा जर्मनीच्या बर्लिन फिल्म फेस्टिवलमध्ये वर्ल्ड प्रीमियर संपन्न झाला. प्रतिष्ठित बर्लिन फेस्टिवलमध्ये उपस्थित असलेल्या चाहत्यांनी सोशल मीडियावर सिनेमाला चांगलाच प्रतिसाद दिला. आता येणाऱ्या दिवसांत सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती रुपयांची मजल मारतो हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.