वजन वाढलं आणि... एग्स फ्रीज केल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला अडचणींचा सामना
एका मुलाखतीमध्ये एग्स फ्रीज करण्याबाबत अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं आहे. जे ऐकून तिचे चाहते थक्क होताना दिसत आहेत.
मुंबई : टीव्ही अभिनेत्री रिद्धिमा पंडितला 'बहू हमारी रजनीकांत' या मालिकेतून लोकप्रियता मिळाली. अभिनेत्री शेवटची 'बिग बॉस ओटीटी'मध्ये झळकली होती. शोमध्ये अभिनेत्रीचा प्रवास खूप मोठा होता. 33 वर्षीय एक्ट्रेसने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मनमोकळेपणाने सांगितलं आहे. तिने एका मुलाखतीमध्ये एग्स फ्रीज करण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. तिने दिलेल्या एका मुलाखतीत एग्ज फ्रिज बाबतचा तिचा अनुभव सांगितला. रिद्धिमा म्हणाली, जेव्हा ती ही प्रक्रिया करत होती तेव्हा ती शूटिंगमध्ये व्यस्त होती त्यामुळे तिला खूप समस्यांना सामोरं जावं लागलं. इंजेक्शन्स शरीरावर परिणाम करतात आणि खूप थकवतात.
नाही घेवू ईच्छित कोणताच चान्स
रिद्धिमाने डिजिटल कमेंट्रीसोबत बोलताना सांगितलं की, मदरहुड तिच्यासाठी खूप महत्वाचं आहे. एग्स फ्रीज करण्याबाबत अभिनेत्री म्हणाली की, मला याला केवळ एक गोष्ट बनवू ईच्छित नव्हते. कारण मी माझ्या ३० च्या दशकात आहे. मला कोणताही चान्स घ्यायचा नव्हता. 'स्त्रीकडे एक जैविक घड्याळ असते जे प्रत्येक दिवसागणिक टिकत असते. आपण भरपूर एग्ज घेऊन जन्माला आलो आहोत आणि थोड्याच कालावधीनंतर ती नष्ट होतात. मला या गोष्टी माहीत होत्या.''
रिद्धिमाने सांगितलं की, शूटींग दरम्यान ती एग्स फ्रीजिंगच्या प्रक्रियेतून जात होती. याबाबत बोलताना ती म्हणाली की, 'शारीरिकदृष्ट्या खूप थकवा येतो. हे सोपं नाही आहे, आपल्याला खूप इंजेक्शन्स घ्यावी लागतात. ब्लोटिंग होतं, वजन जास्त वाढतं, जे सांगतात ते टेक्निकली असं काही अलार्मिंग नाही. जास्त ब्लोटिं होतं. खरंतर हे संपत जातं. हार्मोनल इंजेक्शन्समुळे तुम्ही लठ्ठ होतात असा एक समज आहे, तसं नाही... पण हार्मोनल इंजेक्शननंतर थोडा क्रॅश होतो.''
अभिनेत्री रिद्धिमा पंडित कधी करणार लग्न?
लग्नाच्या प्रश्नावर अभिनेत्रीने सांगितलं की, 'मला माहित नाही की भविष्यात मला लग्न करायचं आहे की नाही. मला योग्य जोडीदार सापडतो की नाही. यावर हे सगळं अवलंबून आहे. गेल्या काही वर्षांत अनेक महिलांना एकट्याने जगावसं वाटतं. कदाचित मला ते एकट्याने करायला आवडेल पण निदान आता तरी मला काळजी नाही. मी माझं काम बायोलॉजिकली केलं आहे.'