मुंबई : छोट्या पडद्यापासून ते साऊथ चित्रपटांमध्ये अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी प्रसिद्ध अभिनेत्री हंसिका मोटवानी हिच्याबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही अभिनेत्री लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. हंसिका मोटवानीच्या अचानक लग्नाच्या बातमीने चाहत्यांना नक्कीच धक्का बसला असेल. चला तर मग या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला अभिनेत्रीच्या लग्नाची संपूर्ण माहिती सांगणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हंसिका मोटवानीच्या लग्नाची डिटेल
हंसिका मोटवानीने बालकलाकार म्हणून टीव्हीवरून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. ती 'शाका लाका बूम बूम' या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये दिसली आहे. ही अभिनेत्री तिचं लग्न धुमधडाक्यात करणार असून तिने तिच्या लग्नासाठी जबरदस्त प्लॅनिंग केलं आहे. डिसेंबर महिन्यात ती जयपूरच्या 450 वर्ष जुन्या किल्यात तिचं लग्न करणार आहे.


अभिनेत्री डिसेंबर 2022 मध्ये सात फेरे घेईल
हंसिका मोटवानी डिसेंबरमध्ये शाही पद्धतीने लग्न करणार असल्याचा दावा इंडिया टीव्हीच्या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. तिने लग्नासाठी 450 वर्ष जुना किल्ला निवडला आहे. जिथे ती तिच्या स्वप्नातील राजकुमारासोबत सात फेरे घेणार आहे. तिच्या लग्नाचे सर्व विधी जयपूरच्या मुंडोटा किल्ल्यावर होणार आहेत.



हंसिका मोटवानीकडून तिच्या लग्नाबाबत कोणतंही वक्तव्य समोर आलेलं नाही किंवा तिने या बातम्यांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मुंडोटा किल्ल्यात लग्नाची तयारी सुरू झाल्याचं सूत्रांचं म्हणणे आहे. लग्नाला उपस्थित सर्व पाहुण्यांचं भव्य स्वागत केले जाईल.