मुंबई : अभिनेत्री हंसिका मोटवानी (Hansika Motwani) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.  हंसिका मोटवानी हिने बॉलिवूडसह तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. बाल कलाकार म्हणून तिने अभिनयाला सुरुवात केली होती. आता ती सोहेल कठुरिया (Sohail Kathuria) सोबत विवाह करणार आहे. या जोडप्याच्या लग्नाला एक महिना उरला असताना, त्यांच्या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा आहे. पण हंसिका मोटवानी ज्याच्या सोबत विवाह करणार आहे तो सोहेल कठुरिया कोण (ho is Sohail Kathuria) हे जाणून घेण्याची उत्सूकता तिच्या चाहत्यांमध्ये दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हंसिकाचा होणारा पती सोहेल कठुरिया याने पॅरिसच्या आयफेल टॉवरसमोर एका गुडघ्यावर बसून तिला प्रपोज (Sohail Kathuria proposed Hansika Motwani) केले होते. हा प्रपोज फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रिपोर्ट्सनुसार, हंसिका आणि सोहेल कठुरिया काही काळापासून चांगले मित्र आहेत. ते व्यावसायिक भागीदार देखील आहेत. वृत्तानुसार सोहेल हा मुंबईस्थित उद्योजक आहे. एकत्र काम करत असताना ते एकमेकांच्या प्रेमात पडले.


2 नोव्हेंबर रोजी हंसिकाने तिचा प्रियकर सोहेल कठुरिया याला जगासमोर आणले. पॅरिसमध्ये झालेल्या रोमँटिक प्रपोजचे फोटो तिने शेअर केले आहेत. पोस्ट शेअर करताना हंसिकाने हृदयाच्या इमोजीसह "Now & Forever (sic)" असे लिहिले आहे.


हंसिका मोटवानी आणि सोहेल कठुरिया (Hansika Motwani-Sohail Kathuria) येत्या काही दिवसांत लग्नाची औपचारिक घोषणा करणार आहेत. त्यांचे लग्न 2 ते 4 डिसेंबर दरम्यान राजस्थानमध्ये होणार आहे. कुटुंबातील सदस्य आणि मित्रमंडळी या लग्नसोहळ्याला हजेरी लावणार आहेत.