मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री हंसिका मोटवानी ( Hansika Motwani ) लवकरच तिचा बॉयफ्रेंड सोहेल कथुरियासोबत ( Sohail kathuriya ) लग्नबंधनात अडकणार आहे. सोहेल आणि हंसिका ( Sohail and Hansika Marriage ) बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. दोघेही एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखतात आणि बिझनेस पार्टनर देखील आहेत. हंसिका मोटवानीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यावरुन विवाह लवकरच पार पडणार असल्याचं दिसतंय. ( Hansika Motwani plan to stream her marriage live on OTT )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोहेलने अभिनेत्री हंसिकाला आयफेल टॉवरसमोर ( Eiffel Tower ) लग्नासाठी प्रपोज केले होते. हंसिकाने फोटो शेअर करताना रोमँटिक कॅप्शन दिले होते. या कॅप्शनमध्ये हंसिकाने 'आयुष्यभरासाठी' असे लिहिले होते. पण आता त्यांच्या विवाहबाबत आणखी एक माहिती समोर येत आहे. अभिनेत्री हंसिकाच्या लग्नाचं लाईव्ह स्ट्रीमिंग केलं जाण्याची शक्यता आहे. जे ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिसेल. पण OTT प्लॅटफॉर्मचे नाव अद्याप समोर आलेले नाही. याबाबत अभिनेत्रीने अजून कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण असे मानले जाते की त्यांच्या लग्नाच्या लाइव्ह स्ट्रीमिंगमध्ये OTT प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टार आघाडीवर आहे.


जयपूरमध्ये पार पडणार विवाह सोहळा


जयपूरच्या 450 वर्ष जुन्या मुंडोटा किल्ल्यावर 2 डिसेंबरपासून हंसिकाचं प्री-वेडिंग फंक्शन्स सुरू होणार आहेत. 3 डिसेंबर रोजी मेहेंदी व संगीताचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.


हंसिकाचा होणारा पती सोहेलचे हे दुसरे लग्न आहे. याआधी 2016 मध्ये त्याने रिंकीशी लग्न केले पण त जास्त काळ टिकू शकले नाही. त्यावेळी हंसिका देखील त्यांच्या लग्नाला आली होती.


तामिळ आणि तेलुगू चित्रपटांव्यतिरिक्त, हंसिका मोटवानीने हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे, कोई मिल गया, अबरा का डबरा, मनी है तो हनी है या सिनेमांमध्ये तिने काम केलंय.