मुंबई:होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहचलेले सर्व ताईंचे भावोजी, प्रसिद्ध अभिनेते आदेश बांदेकर यांचा आज वाढदिवस आहे. आदेश बांदेकर सध्या झिंग झिंग झिंगाट कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत. श्रीसिद्धिविनायक गणपति मंदिरचे ते अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र राज्याच्या फडणवीस सरकारने आदेश बांदेकर यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा दिला आहे. शिवसेनेचे नेता असलेल्या बांदेकर यांनी आपल्या करियरची सुरुवात दूरदर्शनवर प्रसारीत होणाऱ्या 'ताक धिना धिन' कार्यक्रमाने केली. आणि २००९ मध्ये त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला


सर्वंचे लाडके व्यक्तिमत्व असलेले भावोजी दोनवेळा मृत्यूच्या जाळ्यातून बाहेर आलेत. नुकताच झिंग झिंग झिंगाट कार्यक्रमाचे शूटींग सुरू असताना अचनाक सेटला आग लागल्याची घटना चेंबूरमध्ये घडली. यामध्ये अभिनेते आणि सूत्रधार आदेश बांदेकर थोडक्यात बचावले. त्यावेळेस सेटवर जवळपास १०० ते १५० लोक उपस्थित होते.