Happy Birthday Mammootty : अभिनेता ममूटीचा जन्म 7 डिंसेबर 1948 त्रावणकोर केचीनच्या कोट्टायम जिल्ह्यात झाला. ममूटीचे पूर्ण नाव मुहम्मदकुट्टी इस्माइल आहे. चित्रपट विश्वात पदार्पण करण्याआधी त्यांनी 2 वर्ष वकिली सुद्धा केली आहे. ममूटीने एका ठिकाणी जिथे मूख्यत्वे मल्याळम चित्रपटांमध्ये काम केलं आहे तर दुसऱ्या ठिकाणी हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि सातासमुद्रापलीकडे म्हणजेच इंग्रजी चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. आज ममूटी 71वा वाढदिवस साजरा करत आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया काही खास गोष्टी.


400 हून अधिक चित्रपटांमध्ये काम


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ममूटीचे चित्रपट विश्वात पदार्पण 1971च्या सुरुवातीला Anubhavangal Paalichakal या मल्याळम चित्रपटातून झाला. पहिल्या चित्रपटात फारसं यश मिळालं नाही. पण त्यांनी मेहनतीच्या जोरावर स्वता:साठी वेगळा platform तयार केला. ममूटीचे योगदान चित्रपट जगात 5 दशके इतका आहे. आतापर्यंत त्यांनी 400 चित्रपटांत काम केले आहे. असं सांगितलं जाते की 1986 मध्ये एकाच वर्षात ममूटीने 35 चित्रपटांमध्ये काम केले आहे. ममूटीच्या हिट चित्रपटांमध्ये 'थीरम तेंदुन्ना थीरा' (1983), 'रुग्मा' (1983), 'कोट्टायम कुंजाचान' (1990), 'कनलकट्टू' (1991), 'सागरम साक्षी' (1994), 'राजमनिक्यम' (2005), 'मिशन 90 डेज' (2007), 'द ट्रेन' (2011), 'फेस 2 फेस' (2012) असे अनेक चित्रपट आहेत.



ममूटीची आतापर्यंत सर्वोत्तम कामगिरी


ममूटीला त्याच्या दमदार अभिनयासाठी 3 राष्ट्रीय पुरस्कार, 7 राज्य पुरस्कार, 13 फिल्म फेयर पुरस्कार और 1998 में पद्माश्रीने सन्मानित केले आहे. 1981 मध्ये अहिस्म चित्रपटातून नाव मिळाले आणि सोबतच त्या चित्रपटाला सेकेंड बेस्ट एक्टर केरल स्टेट फिल्म अवॉर्ड देखील मिळाला. ममूटीने त्यांच्या करिअरमध्ये दमदार कामगिरी केली आहे, पण काही चित्रपट असे आहेत की कोणत्याही किंमतीत विसरता येणार नाही. Oru Vadakkan Veeragatha, थलापति आणि बाबा साहेब आंबेडकर या चित्रपटांमधील ममूटीच्या अभिनयाचे खूप कौतूक झाले.


ममूटी यांचे कार कलेक्शन


आपण नेहमीच पाहतो की चित्रपट तारकांचे वेगवेगळे शौक असतात जसे की काही सेलेब्सकडे शू कलेक्शन आहे तर काही सेलेब्स ना परफ्यूम्सचा शौक असतो. पण ममूटीला गाड्यांचा शौक आहे. indiakestar.com यांच्या माहितीनुसार ममूटीजवळ 369 गाड्या आहेत. ममूटीच्या कार कलेक्शनमध्ये टोयोटा पासून मर्सडीज ते जॅग्युआर या गाड्यांचा देखील समावेश आहे. ममूटीला साउथमध्ये ऑडी खरेदी करणारा पहिला स्टार म्हणून देखील ओळखले जाते.


ममूटी यांची नेटवर्थ


ममूटी त्याच्या चित्रपटांव्यतिरिक्त त्यांच्या लग्जरी लाइफस्टालसाठी देखील ओळखला जातो. मीडिया रिपोर्ट्सनुसार मल्याळम कम्यूनिकेशनसचे चेअरमन आहेत, ज्यात कैराली टीव्ही, कैराली न्यूज आणि कैराली व्ही टीव्हीचा समावेश आहे. एका फिल्मसाठी ममूटी जवळ जवळ 10 कोटी इतकी रक्कम घेतात आणि त्यांचे वार्षिक उत्पन्न 50 कोटीहून अधिक आहे. finapp.co.in वेबसाइटच्या माहितीनुसार ममूटी 300 करोडहून अधिक मालमत्तेचे मालक आहेत. चित्रपट आणि मल्याळम कम्यूनिकेशनस व्यतिरिक्त ममूटी बऱ्याच ब्रँडमध्ये एंडोर्स ही करतात.


ममूटी यांचे वैयक्तिक आयुष्य


ममूटीचे वैयक्तिक आयुष्य ही लोकांच्या चर्चेचा विषय आहे. ममूटी यांनी 1979 मध्ये सुलफत सोबत लग्न केले होते. ममूटी आणि सुलफत मल्याळम सिनेमांत बेस्ट कपल्स म्हणून ओळखले जाते. सुलफत त्यांची पत्नी हीच त्यांची बेस्ट फ्रेंड आहे असे ते सांगतात. साउथमधील सुपरहिट एक्टर दुलकर सलमान, ममूटी- सुलफतचा मुलगा आहे. दुलकर सलमान व्यतिरिक्त, ममूटी- सुलफत यांना एक मुलगी देखील आहे. ममूटी हे समाजकल्याणात देखील महत्तवाची कामगिरी बजावतात आणि लोकांची मदत करायला देखील तत्पर असतात.