मुंबई : 'दबंग' सलमान खान बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे. सलमानने केवळ इंडस्ट्रीतच आपलं आपलं स्थान निर्माण केलं नाही आहे. तर त्याने अनेक चाहत्यांच्या मनात देखील आपलं स्थान पक्कं केलं आहे. एवढेच काय तर सलमानने अनेक तरुण लोकांना अभिनयाच्या संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यामुळेच सलमानचा वाढदिवस त्याच्या चाहत्यांसाठी आणि जवळत्या लोकांसाठी एखाद्या सणापेक्षा कमी नसतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वजण अभिनेत्याचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करतात. आज सलमानच्या 56 व्या वाढदिवसानिमित्त या अभिनेत्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


त्यात सलमानने आज त्याच्या चाहत्यांना वाढदिवसानिमित्त एक खास सरप्राईज दिलं आहे. वाढदिवसानिमित्त पापाराझींशी संवाद साधताना दबंग खानने त्याच्या बहुप्रतिक्षित चित्रपट बजरंगी भाईजानच्या सिक्वेलचं टाइल उघड केलं आहे.


जेव्हा सलमानला एसएस राजामौलीसोबत काम करण्याबाबत विचारण्यात आले, तेव्हा त्याने या प्रश्वांना फेटाळून लावले आणि तो म्हणाला की, सध्या तो त्याच्यासोबत काम करत नाही. मात्र, सलमानने राजामौलीचे वडील केव्ही विजयेंद्र प्रसाद यांच्यासोबत बजरंगी भाईजान २ साठी काम करण्याबाबत वक्तव्य केलं आहे.


सलमानने भजरंगी भाईजान 2 च्या नावाचा खुलासा


बजरंगी भाईजान 2 बद्दल बोलताना सलमान म्हणाला की, या चित्रपटाचं टाइटल 'पवन पुत्र भाईजान' (Pavan Putra Bhaijaan) असं ठेवण्यात आलं आहे. सलमान पुढे म्हणाला की, टायगर 3 चे शूटिंग पूर्ण केल्यानंतर तो 'नो एंट्री' आणि 'कभी ईद कभी दिवाळी'च्या सिक्वेलवर काम करू शकतो.


सलमान खानची तब्येत आता कशी आहे?


सलमान खानची प्रकृती आता ठीक आहे. साप चावल्यानंतर सलमानला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. 6 ते 7 तासांनंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला. सर्पदंशानंतर सलमानला पुन्हा एकदा फिट झाल्याचे पाहून चाहते खूप खूश आहेत आणि सलमानच्या बर्थडेसोबत तो बरा झाल्याचा आनंदही सगळे लोकं साजरा करत आहेत.