मुंबई : झी मराठीवरील 'तुला पाहते रे' हे मालिका अगदी अल्पावधीतच लोकप्रिय झाली. याचं महत्वाचं कारण म्हणजे आपल्या अभिनयाने सगळ्यांनाच भुरळ घालणारा अभिनेता सुबोध भावे. मालिका, नाटक, सिनेमा आणि आता पुन्हा मालिकांकडे वळलेला हा अभिनेता साऱ्यांच्याच आवडीचा. बायोपिकमधून या अभिनेत्याने बालगंधर्व, लोकमान्य टिळक यासारखी दिग्गज व्यक्तिमत्व साकारली. आज या अभिनेत्याचा वाढदिवसानिमित्त आपण त्याची इंटरेस्टिंग लव्हस्टोरी पाहणार आहोत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


सुबोध आणि त्याची पत्नी मंजिरी यांची लव्हस्टोरी फारच इंटरेस्टिंग आहे. सुबोध - मंजिरी यांच शिक्षण वेगळ्या शाळेत झालं असलं तरीही या दोघांची भेट एका नाटकादरम्यान झाली. नाट्यकला मंदिरात या दोघांची पहिली भेट झाली. मंजिरीला पाहताच सुबोध अगदी 'लव्ह अॅट फस्ट साईट' असा तिच्या प्रेमात पडला. त्यावेळी या दोघांच शालेय शिक्षण सुरू होतं. म्हणजे मंजिरी आठवीत तर सुबोध दहावीत शिकत होता. 



सुबोधने मंजिरीला 'शुगर इज शुगर, सॉल्ट इज सॉल्ट, इफ आय लव्ह यु, व्हॉट इज माय फॉल्ट…' अशा आशयाचा मजकूर लिहून त्याने तिला उत्तर विचारले. यावर मंजिरी म्हणाली की मी बालगंधर्व पुलावर आले तर होकार समज नाही आले तर नाही समज. परंतु त्या दिवशी ती तिथे आली आणि तिने आपला होकार कळवला. 1991 मध्ये सुबोधने मंजिरीला प्रपोझ केलं. यानंतर जवळपास दोन वर्षे ते एकमेकांना भेटू लागले. सुबोधने त्याच्या घरच्यांसमोर आपल्या प्रेमाची कबुली दिली परंतु आधी शिक्षणाला प्राधान्य देण्याचा सल्ला त्याच्या घरच्यांनी दिला. 



बारावीला असताना मंजिरी कॅनडाला शिफ्ट झाली. पाच वर्षांकरता मंजिरी कॅनडात राहिली. याकाळात दोघांच प्रेम फक्त पत्राद्वारे व्यक्त केलं जात असे. किंवा एकमेकांना ग्रिटींग कार्ड, गिफ्ट पाठवत असे.  कॅनडातून परतल्यावर जवळपास पाच वर्षांच्या विरहानंतर ते पुण्यात पुन्हा एकमेकांना भेटू लागले. यादरम्यान दोघांनीही एकाच कंपनीत नोकरीही पत्करली होती. त्यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला.गेली २५ वर्षाहून अधिक काळ ते दोघे एकमेकांच्यासोबत आहेत. संसाराच्या वाटेवर तिने दिलेली साथ ही खूप मोलाची असल्याचे तो सांगतो. मल्हार आणि कान्हा या दोन मुलांपैकी मोठा मुलगा मल्हारने “माझा अगडबम” चित्रपटाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले आहे.2001 मध्ये सुबोध - मंजिरीने लग्न केलं.