Happy Birthday Tabbu : बॉलिवूड पदार्पणानंतर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी तब्बू (tabu) आज वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करत आहे. तब्बूने कायम वेग-वेगळ्या भूमिका साकारत बॉलिवूडला अनेक हीट सिनेमे दिले. एक काळ असा होता जेव्हा अनेक प्रसिद्ध अभिनेत्रीमध्ये तब्बू अव्वल स्थानी होती. तब्बूची (Tabbu) प्रोफेशनल लाईफ जेवढी चर्चेत होती, तेवढंच तिच खासगी आयुष्य एका सिनेमाच्या कथे प्रमाणे होतं. आज तब्बूकडे प्रसिद्धी, संपत्ती सर्वकाही असूनही अभिनेत्री एकटी आयुष्य जगते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झगमगत्या विश्वात यशाचं शिखर चढत असताना तब्बूचं नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडण्यात आलं. त्यापैकी एक म्हणजे दाक्षिणात्य अभिनेता अक्किनेनी नागार्जुन. नागार्जुन (Akkineni Nagarjuna) आणि तब्बू एक दोन नव्हे तर तब्बल 10 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. पण त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. लग्न झालं नसलं तरी तब्बू आणि अक्किनेनी नागार्जुनसोबत  यांच्यात आजही मैत्रीचं पूर्वीप्रमाणे आहे. 


ब्रेकअपनंतर तब्बूला अनेकदा त्यांच्या नात्याबद्दल विचारण्यात आलं. अखेर 2007 साली अभिनेत्रीने नागार्जुनसोबत असलेल्या नात्याबद्दल मोकळेपणाने सांगितलं. तब्बू म्हणाली होती, 'आयुष्यात बॉयफ्रेंड येतात-जातात. याठिकाणी नक्की काय सांगावं मला कळत नाही. पण लग्न झालं नसलं तरी आम्ही चांगले मित्र आहोत.' असं देखील तब्बू म्हणाली. (nagarjuna tabu romantic scenes)


एवढंच नाही तर नागार्जुनने देखील तब्बूसोबत असलेल्या नात्याबद्दल कबुली दिली, 'तब्बू आणि मी चांगले मित्र आहोत. माझ्याकडे लपवण्यासारखं काहीही नाही. (tabu and nagarjuna movies)



नागार्जुनच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, नागार्जुन यांच्या पहिल्या पत्नीचं नाव लक्ष्मी दग्गुबाती आहे. तर त्यांची दूसरी पत्नी अमला मुखर्जी आहे.