मुंबई : कारण काहीही असो, प्रसंग कोणताही असो.... संगीताची जोड त्या प्रसंगाला मिळताच तिथलं वातावरणच पूर्णपणे बदलून जातं. संगीत..... एक असं जादुई अत्तर आहे, ज्याचा सुगंध दरवळला की सारेच मंत्रमुग्ध होतात. सध्या आपल्या सर्वांना अशाच एका वेगळ्या वातावरणात नेण्याचं काम करत आहेत, काही लहानगे. (ladakh tour)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लडाखच्या निसर्गसौंदर्याला न्याहाळतानाच एका इन्स्टाग्राम युजरला काही लहान मुलं तिथे गाताना दिसली. त्यांच्या हातात ukulele हे वाद्य दिसत आहे. (Ladahkh photos )


या वाद्याची सुरेख तार छेड ही लहान मुलं या पिढीचा आघाडीचा आणि लोकप्रिय गायक प्रतीक कुहडचं गाणं गाताना दिसत आहेत. मुळात प्रतीक कुहडची गाणी म्हणजे मनावर घातली जाणारी हळुवार फुंकर. (Ladakh Video)


ही मुलंही तिथं लडाखमध्ये Dil Beparwah हे गाणं सादर करताना दिसत आहेत. त्यांचा आवाज आणि एकत्र छेडलेली तान मनाचा ठाव घेऊन जात आहेत. 



भटकंतीवर मनमुराद प्रेम करणाऱ्या अनेकांनीच हा व्हिडीओ त्यांच्या स्टेटसमध्ये शेअर केला आहे. दिवसाची सुरुवात झाल्यानंतर हा व्हिडीओ तुम्हालाही एका वेगळ्याच दुनियेत नेण्याचं काम करत आहे. 


विश्वास बसत नाहीये? तर हा व्हिडीओ पाहा आणि मगच ठरवा....