मुंबई : पॉर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास करणारी सनी लिऑनी (३७) ७ वर्षांपासून भारतीय सिनेमात काम करत आहे.  सिनेमा, टीव्ही शो, डान्स प्लॅटफॉर्म सगळीकडेच तिची चर्चा आहे. डान्सर आणि होस्ट म्हणून तिने आपली चुणूक दाखवली आहे. तिच्या अभिनय कौशल्याची जादू दिसणं अद्याप बाकी आहे. एका राजकीय नेत्याने सनी लिऑनीची तुलना श्रीदेवी-माधुरीशी केली आहे.  नर्गिस, श्रीदेवी आणि माधुरी यांसारख्या अभिनेत्रींकडे पाहण्याच्या दृष्टीकोनातून सनी लिऑनीकडे पाहीलं जाणं गरजेचं असल्याचे गुजरातचा पाटीदार नेता हार्दिक पटेलने म्हटले आहे. आपण सनी लिऑनीचे सिनेमेदेखील त्याच नजरेने पाहिले तर यामध्ये अडचण काय आहे ? तिचे सिनेमा वाईट नजरेने का पाहावे ? असा प्रश्न त्याने विचारला आहे.  आपल्या अजूनही सनी लिऑनीला त्याच नजरेने पाहायचे असेल तर हा देश कधीच बदलणार नाही असेही या २४ वर्षाच्या नेत्याने म्हटले आहे. 


आयटम सॉंग


 'बिग बॉस ५' मधून मिळालेल्या घवघवीत यशानंतर सनी लिऑनीने २०१२ साली 'जिस्म' सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. जॅकपॉट (२०१३), एक पहेली लीला (२०१५), मस्तीजादे (२०१६), बेइमान लव (२०१६) हे तिचे प्रमुख सिनेमा आहेत. सनी आपल्या आयटम सॉंग्ससाठी ओळखली जाते.