अमिताभ बच्चन यांना कुणाचा पुर्नजन्म मानायचे वडील? केली होती `ही` भविष्यवाणी
अमिताभ बच्चन कायमच वडील हरिवंश राय बच्चन यांच्याबद्दल बोलताना दिसतात. नुकतंच `कौन बनेगा करोडपती 16` मध्ये एका कार्यक्रमात एक खुलासा केला आहे. जे ऐकून सगळेचजण स्तब्ध झाले आहेत.
Amitabh Bachchan Reincarnation: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन 11 ऑक्टोबर रोजी 82 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या वाढदिवसाअगोदर 'केबीसी'च्या मंचावर आमिर खान मुलगा जुनैद खानसोबत दिसला. या दरम्यान आमिर खानने अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंश राय बच्चन यांच्या त्या क्षणाची आठवण काढली. जेव्हा बिग बी अतिशय भावूक झाले.
जेव्हा अमिताभ यांचा जन्म झाला...
या प्रोमोमध्ये आमिर खान जुनैदसोबत हॉट सीटवर बसला होता. तो बिग बींना सांगतो की, 'सर तुमचा आज वाढदिवस आहे. तुमचा जन्म झाला तो दिवस तुम्हाला माहित आहेत का?' हे ऐकताच अमिताभ बच्चन स्तब्ध होतात. या दिवसाबाबत अमिताभ बच्चन यांच्या वडिलांनी काही ओळी लिहिल्या आहेत.
वडिलांचा आत्मा
या प्रोमोमध्ये आमिर खान हरिवंशराय बच्चन यांनी लिहिलेल्या ओळी वाचतो. 'तेजीने मला उठवले आणि पोटात दुखत असल्याचे सांगितले. तो ब्रह्म मुहूर्त होता हे स्वप्न इतके स्पष्ट होते आणि मी ते पाहून इतके भारावून गेलो होतो की मी तेजींना सांगू शकलो नाही. त्या अर्ध्या जागेच्या, अर्ध्या झोपलेल्या तोंडातून बाहेर पडले. तेजी तुला मुलगा होणार आहे आणि माझ्या वडिलांचा आत्मा त्यांच्या रूपाने येत आहे. आमिर खानने या ओळी वाचताच बिग बींच्या डोळ्यात पाणी आले. ते भावुक झाले.
महानायक यांचा वाढदिवस
अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस आणखी खास बनवण्यासाठी निर्मात्यांनी हा दिवस शोच्या सेटवर मेगास्टारचा वाढदिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची एक झलक या प्रोमोमध्ये पाहायला मिळाली.