मुंबई : कलाविश्वात पॅचअप-ब्रेकअप कायम होतचं असतात. अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री हरलीन सेठीच्या ब्रेकअपनंतर अनेक चर्चा रंगल्या. पण विकीने अभिनेत्री कतरिना कौफसोबत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे विकी कौशलसोबत ब्रेकअप झाल्यानंतर हरलीननेही आयुष्यात नव्याने सुरुवात केली आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर ती कायम स्वतःचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता देखील हरलीनने एक फोटो शेअर केला आहे. पण स्वतःचा फोटो शेअर करत तिने एक्स बॉयफ्रेंड विकीवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.  स्वतःचा फोटो शेअर करत हरलीनने कॅप्शनमध्ये ‘माझ्या बॉयफ्रेंडच्या तुलनेत रस्ता जास्त खोल आहे.' असं लिहिलं आहे. 



सध्या हरलीनची सोशल मीडिया पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. तिच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत आयुष्यात आनंदी आणि पुढे जाण्याचा सल्ला दिला आहे. 


हरलीन सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, ‘गोविंदा नाम मेरा’, ‘सॅम बहादुर’, ‘द इम्मॉर्टल अश्वत्थामा’ आणि ‘लुका छुपी २’ या सिनेमांतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.