मिस युनिव्हर्स हरनाझचं घायाळ करणारं फोटोशूट...बोल्ड लूकमुळे वेधलं सर्वांचं लक्ष
मिस युनिव्हर्स हरनाझनं नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. बोल्ड लूकमुळे हरनाझनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
मुंबईः मिस युनिव्हर्स हरनाझनं नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. ज्यामध्ये हरनाझचा बोल्ड आणि बिनधास्त लूक दिसत आहे.
या शूटसाठी हरनाझनं वन पिस घातला असून या ड्रेसला डबल स्लिट आहे. या ड्रेसमध्ये हरनाझ खूपच सुंदर दिसत आहे.
फोटोमधील हरनाझच्या अदांनी चाहते घायाळ झाले आहेत. सोशल मीडियावर तिच्या या फोटोजवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. चाहत्यांकडून तिच्या सौंदर्याचं कौतुक करण्यात येत आहे.
अलीकडेच संधू तिच्या वाढत्या वजनामुळेही चर्चेत आली होती. हरनाझ celiac नावाच्या आजाराशी झुंज देत आहे.
हे अन्नामध्ये असलेल्या ग्लूटेनच्या प्रतिक्रियेमुळे होते. वाढलेल्या वजनामुळे ट्रोल करण्यात आलं होतं. यावर तिने ट्रोल करणाऱ्यांना चांगलंच सुनावलं. शाळेच्या दिवसांमध्ये तिला खूप बारीक होती म्हणून तिला चिडवलं जायचं. .
हरनाज संधूने 80 देशांतील मुलींना हरवून मिस युनिव्हर्स 2021 स्पर्धा जिंकली आहे. चंदीगडची मॉडेल आणि अभिनेत्री हरनाज संधू हिने 70व्या मिस युनिव्हर्समध्ये 'मिस युनिव्हर्स 2021'चा मुकुट पटकावला आहे.
सुष्मिता सेन आणि लारा दत्ता यांच्यानंतर ती मिस युनिव्हर्सचा किताब जिंकणारी तिसरी भारतीय आहे..
हरनाज संधू मूळ चंदिगडची असून ती २१ वर्षांची आहे. हरनाज संधूने 'यारा दियां पौ बरन' आणि 'बाईजी कुटंगे' सारख्या पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे.
चंदीगडच्या एका शीख कुटुंबात वाढलेल्या हरनाजला लहानपणापासूनच फिटनेस आणि फॅशनमध्ये रस होता. तिने अनेक ब्युटी इव्हेंटमध्येही भाग घेतला आहे..