`11 महिने ऑस्ट्रेलियात टॅक्सी ड्रायव्हरचं काम...`, Harrdy Sandhu नं सांगितला क्रिकेटर ते गायक होण्याचा प्रवास
Harrdy Sandhu : हार्डी संधू हा लोकप्रिय पंजाबी गायक आहे. या गायकानं आजवर अनेक गाजलेली गाणी आपल्याला दिली आहेत. पण तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का की हार्डी संधू एकेकाळी क्रिकेटर होता. तर त्यानंतर हार्डीनं गायक म्हणून करिअर करण्याचा निर्णय का घेतला याविषयी खुलासा केला आहे.
Harrdy Sandhu : हार्डी संधू हा लोकप्रिय पंजाबी गायक आहे. हार्डीनं त्याच्या आवाजानं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. हार्डी हा फक्त एक गायक नाही अभिनेता आणि क्रिकेटर आहे. पण हार्डी संधूनं कधी गायक होण्याचा विचार केला नव्हता. त्याचा क्रिकेटर होण्याची इच्छा होती. पण त्याच्यासोबत अशी एक घटना झाली की त्यानं क्रिकेटर होण्याचं स्वप्न सोडून म्युझिक क्षेत्रात पदार्पण केलं आहे.
2005 मध्ये हार्डीला खूप मोठी दुखापत झाली होती. भारताच्या अंडर 19 च्या संघात बंगळुरुमध्ये खेळत होता. त्याचवेळी हार्डीच्या बॅकमध्ये इंजरी झाली आणि त्यातून बाहेर पडायला त्याला दीड वर्ष लागले. त्यानंतर हार्डी रणजी खेळत होता तेव्हा त्याला ढोपरमध्ये इंजरी झाली. त्यावेळी मला कळलं की आता त्याच्याकडून होणार नाही. तेव्हा झालेली दुखापत अजून ठीक झालेली नाही. त्यानंतर मी फिल्ड बदलली. वयाच्या 18 व्या वर्षी मी क्रिकेट खेळण सुरु केलं, तेव्हा मी संपूर्ण जग फिरलो होतो. त्यामुळे मला अनेक गोष्टी कळू लागल्या होत्या. पण आजही मी क्रिकेटला मिस करतो. मला वाटतं की बॅट आणि बॉल घेऊन परत खेळायला सुरुवात करू. दोन-तीन वर्षांपूर्वी मी माझ्या एका कोचला फोन करून सांगितलं की मला पुन्हा एकदा क्रिकेट खेळायचं आहे. तेव्हा ते म्हणाले की शांत बस, जे करतोयस ते कर. खूप मेहनत करावी लागते. पुन्हा इंजरी झाली तर?
हेही वाचा : Thalapathy Vijay चित्रपटसृष्टी सोडणार? समोर आलं आश्चर्यकारक कारण
क्रिकेट ते संगीतमध्ये येण्याचा हा प्रवास होता तो किती कठीण होता याविषयी विचारता हार्डी म्हणाला, जेव्हा मला दुसऱ्यांदा दुखापत जाली होती, तेव्हा मला कळत नव्हतं की मी काय करू? कारण दहा वर्षे मी एकच गोष्ट केली होती. त्याशिवाय मला दुसरं काही येतही नव्हतं. तेव्हा डॉक्टरांकडे देखील इतकं काही नसायचं. चांगल्या डॉक्टरांकडे इंजरीचा तपास करून घेण्यासाठी मी विद्यार्थ्याच्या व्हीजावर ऑस्ट्रेलिया गेलो. ऑस्ट्रेलियात राहण्यासाठी आणि माझ्या रोजच्या जीवनातील गर्जा पूर्ण करण्यासाठी 11 महिने टॅक्सी चालवली. टॅक्सीत नेहमीच मी गाणं गुनगुनायचो. गाण्याच्या दरम्यान, माझ्या लक्षात आलं की मी गाणं गाण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यानंतर ऑस्ट्रेलियातून मी जेव्हा परतलो. तेव्हा सगळ्यात आधी मी क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला. श्रीलंकाच्या फिजियो टीमच्या डॉक्टरांनी मला दोन इंजेक्शन दिले आणि मी पुन्हा खेळायला लागलो. एकदा परत रणजी टीममध्ये आलो. पण परत मला तशीच दुखापत झाली. मी डिप्रेशनमध्ये गेलो होतो. दोन महिन्यांपर्यंत मी माझ्या रुममधून बाहेर पडलो नव्हतो. त्यानंतरच मी संगीताला आपलं करण्याचा निर्णय घेतला. 2010 मध्ये मी सेमी क्लासिकल शिकण्यास सुरुवात केली. कुटुंबानं मला खूप पाठिंबा दिला.