मुंबई : बॉलिवूडमध्ये अलीकडच्या काळात चित्रपटांबाबत नवनवे प्रयोग होत असतात. यामध्ये खेळाडूंच्या आयुष्यावर होणाऱ्या चित्रपटांची निर्मिती वाढली आहे आणि त्याला प्रेक्षकांची पसंती देखील मिळत आहे. त्यामुळे सध्या बॉलिवूडमध्ये या ट्रेंडची चांगलीच चलती आहे. धोनी, सचिन या खेळाडूंनंतर आता ००८ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत १० मीटर नेमबाजी प्रकारात वैयक्तिक गटात सुवर्णपदकाची कमाई करणाऱ्या अभिनव बिंद्राच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यात अभिनव बिंद्राची भूमिका साकारणार आहे हर्षवर्धन कपूर. हर्षवर्धनने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन अभिनव बिंद्रासोबतचा एक फोटो पोस्ट करत त्यासोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये ही माहिती दिली. त्यात त्याने असे म्हटले आहे की, "कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही नेहमीच खास असते. त्यातही देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी करणाऱ्या व्यक्तीची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. म्हणून मी आनंदी आहे. मी भूमिकेला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन."


अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन याने राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या 'मिर्जिया' या चित्रपटातून आपल्या करियरची सुरुवात केली. सध्या तो विक्रमादित्य मोटवानी यांच्या  'भावेश जोशी'  या आगामी चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट या वर्षाखेरीज प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.