मुंबई : सोनम कपूर आणि तिची बहीण रिया कपूर दोघीही सध्या ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहेत. पण या दोघींची नावे आपल्या पाठीवर नोंदवणाऱ्या एका तरुणाचे फोटो नुकतेच सोशल मीडियावर दिसून आले. दोघींची नावे एकाच वेळी  पाठीवर नोंदवणारा हा तरुण कोण ? तर हा दुसरा तिसरा कोणी नसून सोनम आणि रियाचा भाऊ हर्षवर्धन कपूर आहे. ‘मिर्झिया’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. इतर भावंडांप्रमाणे त्याचे देखील आपल्या बहिणींवर प्रेम असून तो नेहमीच त्यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेयर करतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलीकडेच त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केलाय ज्यामध्ये तो टी-शर्ट घालताना पाहायला मिळतोय आणि त्यात त्याच्या पाठीवरील सोनम आणि रिया ही नावं स्पष्टपणे दिसत आहेत.


हर्षवर्धनने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘मी सुट्टीवर जातोय, त्यामुळे हेच बोलणं योग्य असेल की ‘मी लवकरच परत येईन.” हा व्हिडिओ जुना असल्याने हर्षने त्यावर थ्रोबॅक #thowback असा हॅशटॅग दिलाय.


 




अनिल कपूर स्वत: चित्रपटांमध्ये व्यस्त आहेत आणि त्यांची तिन्ही मुलं बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमावत आहेत. हर्षवर्धन आणि सोनम अभिनय क्षेत्रात काम करत असतानाच रिया, अनिल कपूर यांच्या प्रॉडक्शन हाऊसचं काम सांभाळतेय. याच प्रॉडक्शन हाऊसकडून ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाची निर्मिती केली जातेय, ज्यामध्ये करिना कपूर खान लग्नानंतर पुन्हा चंदेरी पडद्यावर अवतरणार आहे.