मुंबई: प्रसिद्ध कोरियोग्राफर गीता कपूर त्यांच्या जॉली अंदाजामुळे बॉलिवूडमधील सगळ्यांच्याच फेवरेट जज बनल्या आहेत. गीता मा म्हणून त्यांची इंडस्ट्रीत ओळख आहे. त्यांच्या स्टूडेंट्सने त्यांना हे नाव दिलं आहे. सध्या गीता कपूर टेलिव्हिजनवरील सुपर डान्सर सीजन 4 मध्ये परिक्षकाच्या भूमिकेत दिसतायेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गीता यांच्या दमदार डान्स अंदाजावर लाखो चाहते फिदा आहेत. त्यात त्यांची प्रत्येक स्पर्धकाला वेळोवेळी मोटीव्हेंट करण्याची सवय देखील अनेकांना खूपच आवडते. त्यामुळे या गीता मा वर प्रेम करणारा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. 




पण गीता मा अद्याप सिंगल आहेत. त्यांच्या  खाजगी आयुष्याबद्दल फार कमी वेळा ऑन स्क्रिन त्या बोलताना दिसतात. डान्स कोरियोग्राफर गीता कपूर यांच्यावर प्रेम करणारा कुणी तरी नक्कीच असेलच ना, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. 


गीता कपूर यांनी अद्याप लग्न केलेलं नाहीये, त्यामुळे त्यांच्या रिलेशनशीप स्टेटसबद्दल अनेकदा चर्चा रंगताना दिसते. त्याचं नावं बऱ्याचदा एका बॉलिवूड मॉडेलसोबत जोडलं जातं, ज्याचं नाव राजीव खिंची असं आहे. राजीव आणि गीता यांचे फोटोज देखील कमालीचे व्हायरल होताना दिसतात. 




बऱ्याचदा बॉलिवूड इव्हेंटमध्ये देखील ही जोडी एकत्र हजेरी लावताना दिसली. त्यामुळे गीता आणि राजीव एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांनी आणखीनंच जोर धरला. गीताने राजीवसोबतचे काही फोटो देखील इंस्टाग्रामवर शेअर केले होते. 


गीताने तिच्या रिलेशनशीपबद्दल कोणतीही गोष्ट अद्याप अधिकृत रित्या सांगितलेली नाहीये. पण काही दिवसांपूर्वी गीता कपूरने कपाळावर कुंक लावल्याचा एक व्हिडिओ शेअर केला होता, हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता.याउलट राजीवसोबतच्या नात्याबद्दल सुरु असलेल्या चर्चांना पुर्ण विराम देत आम्ही फक्त चांगले मित्र असल्याचं ही तिनं एका मुलाखतीत सांगितलं होतं.