मुंबई : शाहरुख खान आणि काजोल यांचा ब्लॉकबस्टर 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हा चित्रपट मुंबईच्या मराठा मंदिर थिएटरमध्ये आजही दाखवला जातोय. २१ वर्षांनंतर आजही हा चित्रपट बघण्यास लोकं जातात, हा एक रेकॉर्डच ठरलाय. रोज डीडीएलजेचा एक शो या थिएटरमध्ये दाखवला जातो. परंतु, पहिल्यांदाच 'हसीना पारकर' चित्रपटामुळे 'डिडिएलजे'चा हा रेकॉर्ड तुटलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकताच, सिंगल स्क्रीन थिएटर असलेल्या मराठा मंदिरमध्ये श्रद्धा कपूरच्या 'हसीना पारकर' या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. ट्रेलर लॉन्च कार्यक्रमामुळे १९९५ पासून चालणारा 'डीडीएलजे'च्या शोचा रेकॉर्ड तुटला. 'हसीना पारकर' हा चित्रपट दाऊद इब्राहिमच्या बहिनीच्या अर्थात हसीना पारकर हिच्या आयुष्यावर आधारलेला आहे. डोंगरीच्या परीसरात दाऊद आणि त्याच्या बहिणीचं बालपण गेलं. त्यामुळेच हा चित्रपटाच ट्रेलर मराठा मंदिरमध्येच लॉन्च करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला होता.


१८ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात पहिल्यांदाच श्रद्धा कपूर आणि तिचा सख्खा भाऊ सिद्धांत कपूर सोबत झळकणार आहेत. सिद्धांत कपूरने या चित्रपटात दाऊदची भूमिका साकारली आहे. अपूर्व लखिया दिग्दर्शित झालेल्या या चित्रपटात श्रद्धा कपूरने आपलं वजन वाढवलेलंही दिसतंय. या ट्रेलरमध्ये हसीनाची एक सामान्य स्त्रीपासून एक गुंड बनण्याचा प्रवास चित्रीत करण्यात आलाय.