मुंबई : 1971चे सुपरस्टार राजेश खन्ना, शम्मी कपूर आणि हेमा मालिनी यांच्या फिल्मी स्टाईलमधील 'जिंदगी एक सफ़र है सुहाना' हे गाणे जबरदस्त हिट ठरलं. हे गाणं आजही तितकंच लोकप्रिय आहे जितके ते रिलीजच्या वेळी होतं. हे गाणे लिहिणारे लेखक हसरत जयपुरी साहेब होते. या गाण्याला किशोर कुमार यांनी आवाज दिला असून शंकर जयकिशन यांनी संगीत दिलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किशोर कुमार यांची गायलेल्या वर्जनला राजेश खन्नावर चित्रित केलं होतं तर दुसर्‍या वर्जनला आवाज मोहम्मद रफी यांनी दिला होता, जो शम्मी कपूर, हेमा मालिनी आणि राजेश खन्ना यांच्यावर चित्रीत केला गेला. या गाण्यासाठी हसरत साहेब यांना सर्वोत्कृष्ट गीतकाराचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.



हसरत जयपुरीचा यांचा जन्म १५ एप्रिल १९२२ रोजी जयपूर येथे झाला होता. ईथे त्यांनी मध्यम स्तरावर इंग्रजीचं शिक्षण घेतलं. त्यानंतर आपल्या आजोबा फिदा हुसैन यांच्यासोबत उर्दू आणि पर्शियन भाषेचं शिक्षण घेतलं. तेव्हा ते साधारण वीस वर्षांचे होते.  त्यांनी कविता लिहायला सुरुवात केली.


17 सप्टेंबर 1999 रोजी मुंबईत त्यांचं निधन झालं. आज जरी हसरत साहेब आपल्यात नसले तरी त्यांच्या सदाबहार गाणी येणाऱ्या पिढ्यांना आनंद देत राहतील.


1940 मध्ये आले मुंबईत आणि कंडक्टर झाले
1940मध्ये हसरत साहेब जयपूरहून मुंबईमध्ये आले. ईथे आल्यानंतर बस कंडक्टर म्हणून त्यांनी नोकरीला सुरुवात केली. या नोकरीतून त्यांना अकरा रुपये मासिक वेतन मिळायंच. नोकरीबरोबर ते शायरींच्या स्पर्धेमध्ये  भाग घ्यायचे.


एका शायरीमध्ये पृथ्वीराज कपूर यांनी जयपुरीकडे लक्ष दिलं आणि आपला मुलगा राज कपूर याच्यासाठी त्यांच्याकडे शिफारस केली. राज कपूर शंकर जयकिशन यांच्यासोबत 'बरसात' चित्रपटाची योजना आखत होते. या चित्रपटासाठी त्यांनी आपलं पहिलं गाणं 'जिया बेकारार है' लिहिलं होतं.


ही गाणी ठरली हिट
'बरसात' सिनेमातील गाणी 'जिया बेकरार है' ते 'अंदाज' 'जिंदगी एक सफर है सुहाना' पर्यंत, 'सेहरा' मधील गाणं 'पंख होते तो उड आती रे' ते प्रिन्समधील गाणं 'बदन पे सितारे लपेटे हुए' पर्यंत, गीतकार हसरत जयपुरी यांनी हिंदी सिनेमांना भरपूर सदाबहार गाणी दिली आहेत. बॉलिवूडची बरीच गाणी हसरत जयपुरी यांनी लिहीली. प्रसिद्ध अभिनेते राजेंद्र कुमार आणि वैजयंती माला यांचं 'सूरज'मधील सुपरहिट गाणं 'बहारो फूल बरसाओ, मेरा मेहबूब आया है' हे ही त्यांचंच गाणं आहे.


एका गाण्यासाठी तीन फिल्मफेअर मिळाले
1966मध्ये आई टी प्रकाश राव यांचा सिनेमाचं संगित शंकर जयकिशन यांनी दिलं होतं. या चित्रपटाचे गीतकार शैलेंद्र आणि हसरत साहेब होते. हसरत जयपुरी यांनी ''कैसे समझाऊं बड़ी नासमझ हो, इतना है तुमसे प्‍यार मुझे, चेहरे पर गिरीं जुल्‍फें, बहारो फूल बरसाओ और ओ एक बार आता है दिन ऐसा'  अशी पाच गाणी लिहिली.


ही सर्व गाणी चांगलीच गाजली आणि चित्रपटाला जोरदार पसंती मिळाली. चित्रपटातील गाणं 'बहारो फूल बरसाओ'ला त्या काळात तीन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले.पहिला पुरस्कार सर्वोत्कृष्ट गीतकार हसरत साहेबांना, दुसरा संगीत सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकासाठी शंकर जयकिशन यांना आणि तिसरा पुरस्कार या गाण्याला आवाज देणारे मोहम्मद रफी साहेब यांना देण्यात आला. त्यानंतर हे गाणं प्रत्येक लग्नात वाजले आहे.