`या` मुलांचे घुमर नृत्य पाहिले का ?
पद्मावती चित्रपटावरून वादंग उठले असले तरी त्यातील `घुमर` हे गाणे भलतेच गाजले.
मुंबई : पद्मावती चित्रपटावरून वादंग उठले असले तरी त्यातील 'घुमर' हे गाणे भलतेच गाजले. दीपिकाने आपल्या बहारदार नृत्याने या गीताचे सौंदर्य अधिकच खुलवले. याबद्दल तिचे प्रचंड कौतुक झाले. तिच्या सादरीकरणावर खुश होऊन भन्साळींनी तिला खास भेटवस्तू दिली.
अनेक कलाकारांनी केले डान्स व्हिडिओ
हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर अनेक नृत्याची आवड असलेल्या अनेक कलाकारांनी यावर नृत्य करून व्हिडिओज तयार केले. मात्र या दोन मुलांनी केलेला डान्स व्हिडिओ चांगलाच चर्चिला जात आहे.
सध्या प्रसिद्धीच्या झोतात
'डान्स अँड इन्सपायर' या फेसबुक पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे. आतापर्यंत या व्हिडिओला २२ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.