स्वाती नाईक, झी मीडिया, पनवेल : बॉलिवूडचा दंबग सलमान खानला (Salman Khan) चावलेल्या साप (Snake) अखेर सापडला आहे. त्या सापाला बाटलीबंद करण्यात आलं आहे. सलमानला वाढदिवसाच्या आदल्याच दिवशी साप चावला. सलमानला पनवेलच्या (Panvel) फार्म हाऊसवर रात्री साप चावला. (health update bollywood actor bhaijaan salman khan is safe after snake bite at panvel farm house) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानंतर रात्री 3च्या सुमारास सलमानला कामोठेतील MGM हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. दैव बलवत्तर की चावलेला साप हा बिनविशारी होता.त्यामुळे त्याच्या जिवाला कोणताही धोका नाही. मात्र खबरदारी म्हणून सलमानला 6 तास निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं. 



त्यानंतर सकाळी 9 वाजता घरी सोडण्यात आलं. त्याच्यासोबत दोन डॉक्टरांची टीमही आहे. सध्या सलमान ठणठणीत आहे.  ख्रिसमस आणि वाढदिवसानिमित्त पनवेलच्या फार्महाऊसवर आला आहे. या दरम्यान त्याला सापाने दंश केला.  


लाखो तरूणींच्या ह्दयाची धडकन असलेला सल्लूचा 27 डिसेंबरला वाढदिवस आहे. एका रिपोर्टनुसार, वाढदिवसानिमित्त त्यानं आपल्या खास मित्रांसाठी पनवेलच्या फार्महाऊसवर एक छोटीशी पार्टी आयोजित केली आहे. कोरोनामुळे यंदाही वाढदिवसाचं ग्रँड सेलिब्रेशन असणार नाही.


अंतिम सिनेमाच्या यशानंतर सलमान टायगर-3 च्या शूटिंगमध्ये बिझी असणारं आहे. त्यापूर्वी सर्पदंशांमुळे टायगरला थोडी दुखापत झाली असली तरी संकटांना किक मारत जीत कशी मिळवायचे हे बॉडीगार्डला चांगलंच ठाऊक आहे.