Cannes 2019: पदार्पणातच रेड कार्पेटवर हिना खान `चमकली`
रेड कार्पेटवर हिनाच्या अदा...
नवी दिल्ली : चंदेरी झगमगत्या दुनियेतील प्रतिष्ठित मानला जाणाऱ्या बहुचर्चित चित्रपट महोत्सव 'कान २०१९'ला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून टेलिव्हिजिन अभिनेत्री हिना खान 'Cannes 2019' मध्ये जाण्याची चर्चा होती. अखेर हिना खानचा रेड कार्पेट लुक समोर आला आहे. यंदा हिना खानने 'कान' महोत्सवासाठी पहिल्यांदाच हजेरी लावली आहे. परंतु पहिल्याच रेड कार्पेटवर हिनाने जबरदस्त एन्ट्री करत सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे. तिच्या रेड कार्पेट लुकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे.
हिनाने Ziad Nakad यांच्या कलेक्शनमधून ग्रे रंगाचा शिमर गाऊन घातला आहे. ज्यावर नक्षीकाम करण्यात आलं आहे. हिनाने या गाऊनसोबत लाइट मेकअप केलाय. एक्सेसरीजमध्ये हिनाने Azotiique by Varun Raheja यांच्या कलेक्शनमधील कानातले घातले आहेत. हिनाच्या या संपूर्ण लुकला चाहत्यांकडून मोठी पसंती मिळत आहे. सोशल मीडियावरही हिना खान ट्रेंडिंगमध्ये आहे.
'Cannes Film Festival'साठी दीपिका पदुकोण, कंगणा रानौत, हुमा कुरेशी, मल्लिका शेरावत, ए.आर. रेहमान यांची उपस्थिती असते. यंदा देसी गर्ल प्रियंका चोप्राही पहिल्यांदाच 'कान' महोत्सवासाठी रेड कार्पेटवर उतरणार आहे.
७२व्या 'कान फिल्म फेस्टिवल'मध्ये होणाऱ्या इंडिया पव्हेलियनमध्ये हिना स्पिकर म्हणून हजेरी लावणार असून येत्या २५ मेला हा कार्यक्रम पार पडणार आहे. हिना खानच्या लाइन्स (Lines)या शॉर्टफिल्मची कानमध्ये निवड करण्यात आली आहे. कारगिर युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित असलेल्या या शॉर्टफिल्मची 'कान'साठी निवड झाली आहे. फ्रान्समधील फ्रेंच रिवेरा येथे ७२वा कान फिल्म फेस्टिवल साजरा केला जात आहे. १४ मेपासून सुरुवात झाली असून २५ मेपर्यंत हा महोत्सव सुरु राहणार आहे.