Hema Committee Report : गेल्या बऱ्याच दिवसांपासून मल्याळम चित्रपटसृष्टीत हेमा कमेटीच्या रिपोर्टनंतर अनेक अभिनेत्री या पुढे येऊन त्यांच्यासोबत झालेल्या लैंगिक शोषणाविषयी बोलत आहेत. या सगळ्यात तमिळ अभिनेता रजनीकांत यांनी या प्रकरणात दिलेल्या वक्तव्यानं सगळ्यांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर सगळीकडे त्यांचीच चर्चा रंगली होती. या सगळ्यात मल्याळम अभिनेत्री राधिका सरथकुमार या रजनीकांत यांच्या समर्थनात पुढे आल्या आहेत. 


काय म्हणाले होते रजनीकांत?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रजनीकांत यांनी चैन्नईमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांना या सगळ्या प्रकरणाविषयी काही माहिती नव्हती असं सांगितलं होतं. रजनीकांत यांनी गोंधळल्यासारखे चेहऱ्यावर हावभाव दिले आणि परत प्रश्न विचारा असं सांगितलं. जेव्हा त्यांनी सांगितलं की 'हेमा समिती, मल्याळम...' त्यावर हसत रजनीकांत यांनी उत्तर दिलं की 'मला नाही माहित... मला याविषयी काही माहित नाही. मला माफ करा.' त्यानंतर त्यांनी एका प्रश्नाचं उत्तर दिलं आणि मग पुढे निघून गेले. 


रजनीकांत यांच्या या वक्तव्यावर राधिका सरथकुमार यांनी सांगितलं की रजनीकांत यांना खरंच याविषयी माहित नसेल, जर त्यांना याविषयी थोडीही कल्पना असती तर त्यांनी यावर संपूर्ण प्रतिक्रिया ही नक्कीच दिली असती. पुढे राधिका यांनी या सगळ्यावर त्यांची प्रतिक्रिया देत सांगितलं की ही चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांच्या मौनचा चुकीचा अर्थ निघू शकतो. ते फक्त एकत्र येऊन त्या महिलांसोबत एकत्र येऊन हे व्यक्त करु शकतात की त्यांच्यासोबत अन्याय झाला आहे. 


दरम्यान, राधिका यांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की शूटिंग दरम्यान, व्हॅनिटी व्हॅनमध्ये कॅमेरे लपवण्यात यायचे. त्याविषयी सांगत राधिका म्हणाल्या, 'चार दिवसांपूर्वी कमिटीच्या काही लोकांनी मला बोलावलं. त्यांनी ज्या प्रकारे लगेच या सगळ्यावर अ‍ॅक्शन घेण्यावरून आणि तपास करण्यासाठी स्तुती केली. तेव्हापासून ते सतत या सगळ्या प्रकरणात तपास करत आहेत.' 


हेही वाचा : 'सलमानने माझं करिअर...', 'त्या' वादावर दोन दशकांनंतर विवेक ओबेरॉय स्पष्टच बोलला


राधिका यांनी पुढे हे देखील सांगितलं की अनेक महिला या त्यांच्याविरोधात झालेल्या लैंगिक शोषणाविरोधात ते कधी पुढे येऊन बोलले नाही. त्याचं कारण म्हणजे त्यांचं कोणी एकतरी व्यक्ती ऐकल की नाही असा त्यांना प्रश्न आहे. राधिका सरथकुमार यांनी मल्याळम चित्रपटांमध्ये अनेक धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत.