#Gadar2 : अपने तो अपने होते हैं! तब्बल 40 वर्षांनंतर एकत्र दिसले देओल भावंड, बोलका आहे Video
Gadar2 : तब्बल 40 वर्षांनंतर Gadar2 च्या निमित्ताने पहिल्यांदाच देओल भावंड एकत्र दिसले. 30 ऑगस्टला रक्षाबंधन साजरा करण्यात येणार आहे त्यापूर्वी देओल बहीण भावांमधील हे प्रेम पाहून धर्मेंद्र (Dharmendra) आणि हेमा मालिनी आनंदाने बहरले असतील असं चाहते म्हणत आहेत.
Gadar 2 Screening : अभिनेता सनी देओलचा चित्रपट 'गदर 2' बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. शनिवारी देओल भावंड एकत्र दिसून आले. हो तब्बल 40 वर्षांनंतर सनी देओल ( sunny deol ), ईशा देओल (esha deol ), बॉबी देओल (bobby deol) आणि अहाना देओल (Ahana Deol) ही सावत्र भांवड (hema malini daughter) मीडियासमोर एकत्र दिसली. नुसती दिसली नाही तर त्यांच्यामधील बॉन्डिंग आणि आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पाहिला मिळतं होता. या क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं असून चाहत्यांनी म्हटलं आहे अपने तो अपने होते हैं! (hema malini daughter esha deol special screening gadar 2 sunny deol bobby deol esha deol step sisters Seen together after 40 years video viral )
अपने तो अपने होते हैं!
सावत्र भाऊ सनी देओलच्या 'गदर 2' चे ईशा देओलने तिच्या मित्रांसाठी शनिवारी खास स्क्रिनिंग ठेवलं होतं. त्यावेळी ही भावंड एकत्र आनंदात दिसून आली. एवढंच नाही तर ईशाने यावेळी पैपराजी बोलताना तिने चाहत्यांना हा चित्रपट बघण्याचे आवाहन देखील केलं. हा स्क्रिनिंगसाठी बॉबी देओलही पत्नीसोबत पोहोचला होता. तर Dharmendra आपल्या पहिली पत्नी प्रकाश कौरसोबत पिक्चर पाहण्यासाठी आले होते. मुलांना एकत्र पाहून धर्मेंदी जी खूष झाले असतील असं चाहते म्हणतं आहेत.
काही दिवसांवर म्हणजे 30 ऑगस्टला रक्षाबंधन (Raksha Bandhan 2023 Date) साजरा करण्यात येणार आहे. रक्षाबंधन हा बहीण भावातील पवित्र नात्याचा सण असतो.
त्यापूर्वी देओल चारही भावंड एकत्र दिसल्यामुळे चाहते आनंदी झाले आहेत. भाऊ बहिणींमधील इतकं प्रेम पाहून आनंद झाल्याची कमेंट्स चाहत्यांनी केली आहे. एका म्हटलं आहे की, ''तुमचं प्रेम सदैव असंच राहिलं पाहिजे.''