मुंबई : बॉलिवूडलला भेटलेली ड्रीम गर्ल म्हणजे हेमा मालिनी (Hema Malini). आज देखील त्यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. त्यांचं सौंदर्य, नृत्य, अभिनयाची चर्चा आजही तितकीचं रंगलेली असते. हेमा यांनी त्यांच्या काळात अनेक मोठे चित्रपट बॉलिवूडला दिले. तेव्हा बॉलिवूडवर हेमा यांचं वर्चस्व होतं. त्यामुळे 1979 साली  प्रसिद्ध निर्माते प्रेमजी एक स्क्रिप्ट घेवून हेमा यांच्या घरी आले. पण तेव्हा हेमा यांना कथा काही आवडली नाही. त्यामुळे त्यांनी प्रेमजींसेबत काम करण्यास नकार दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेमा यांच्या बद्दल एक गोष्ट सांगायची झाली तर त्या कृष्णाला भरपूर मानतात. त्यामुळे हेमा यांनी प्रेमजींकडे एक अट ठेवली, जर तुम्ही कृष्णावर आधारित कोणता चित्रपट बनवाल तर मी नक्की काम करेल. त्या असं म्हणाल्यानंतर प्रेमजींनी सरळ गुलजार यांना गाठलं आणि 'मिरा'वर कथा लिहिण्यास सांगितलं. तर आता प्रेमजींनी एवढं केल्यानंतर हेमा यांच्याकडे होकार देण्याशिवाय दुसरा पर्यायचं नव्हता. 


चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली. चित्रपट बिग बजेटचा असल्यामुळे चित्रीकरण थांबवण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला. असा प्रकार हेमा यांना कळाल्यानंतर त्यांनी चित्रपटासाठी मी मानधन घेणार नाही, तुम्ही जे द्याल ते मी स्वीकारेल. पण चित्रीकरण थांबवू नका. अशी विनंती त्यांनी निर्मात्यांना केली.


त्यानंरत चित्रपटासाठी मिळालेले पैसे हेमा यांनी आतापर्यंत खर्च केलेला नाही. 'हा कृष्णाने मला दिलेला प्रसाद आणि आशिर्वाद आहे. तो कायम मी माझ्या जवळचं ठेवेलं' असं हेमा म्हणाल्या.