बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) विवाहित आणि चार मुलांचे वडील असताना 26 वर्षांनी वयाच्या 45 व्या वर्षी ते पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकले होते. पहिली पत्नी प्रकाश कौर (Prakash Kaur) यांच्यापासून त्यांना सनी देओल (Sunny Deol), बॉबी देओल (Bobby Deol) यांच्यासह 4 मुलं होती. यानंतर त्यांनी हेमा मालिनी (Hema Malini) यांच्याशी दुसरं लग्न केलं. हेमा मालिनी यांच्यापासून त्यांनी इशा (Esha Deol) आणि अहाना (Ahaana) या दोन मुली आहेत. धर्मेंद्र यांनी सहा मुलं असतानाही सर्वांना समान महत्त्व दिलं. मात्र त्यांनी आपल्या मुलींसाठी काही बंधनं आखली होती. त्यांनी लहान कपडे घालणं त्यांना आवडत नव्हतं. तसंच त्यांना बाहेर फिरायला जाण्याची परवानगीही नव्हती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


धर्मेंद्र अतिशय पुराणमतवादी’


सिमी गरेवाल यांना दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत हेमा मालिनी यांनी धर्मेंद वडील म्हणून कसे आहेत याबद्दल सांगितलं होतं. "जेव्हा कधी ते मुंबईत येत असत तेव्हा ते घरी मुलांना भेटण्यासाठी येत असत आणि अभ्यासाबद्दल गप्पा मारायचे. कपड्यांबाबत ते फार ठराविक आहेत. मुलींना पंजाबी ड्रेसमध्ये पाहायलाच त्यांना आवडायचं. जेव्हा ते घरी येणार असं समजायचं तेव्हा मुली लगेच पंजाबी ड्रेस घालण्यासाठी धावत असत," असं हेमा मालिनी यांनी सांगितलं होतं.


पुढे त्यांनी स्पष्ट केलं होतं की, "त्यांचा जिन्स किंवा इतर गोष्टींना विरोध नाही. मात्र पंजाबी ड्रेसला ते प्राधान्य देत असत. मी मुलींना सांगायचे जर तुमच्या वडिलांना आवडतं तर तुम्ही तसे कपडे घालायला हवेत". हेमा मालिनी यांनी ही मुलाखत दिली तेव्हा ईशा आणि अहानाचं वय 17 आणि 14 वर्षं होतं. 


धर्मेंद्र यांच्याबद्दल अधिक बोलताना हेमा मालिनी यांनी सांगितलं की, “ते खूप पारंपारिक आणि पुराणमतवादी आहेत. त्यांनी आजपर्यंत माझे कोणतेही स्टेज परफॉर्मन्स पाहिलेले नाहीत जरी ते जगभरात खूप लोकप्रिय आहेत. त्यांना वाटतं की मी रंगमंचावर खूप वेगळी दिसते. जेव्हा मी परफॉर्म करते तेव्हा मी त्यांची नाही असं त्यांना वाटतं. वरवर पाहता, मी खूप वेगळी दिसते. त्यामुळे त्यांना माझे शो पाहायचे नसतात”.


हेमा मालिनी यांच्यासह इशा देओलही मुलाखतीत हजर होती. तिला यावेळी तुझी चित्रपटात काम करण्याची काही इच्छा आहे का? असं विचारलं असता ती म्हणाली 'मला रस आहे. पण माझे वडील काय सांगतात त्यावर सगळं अवलंबून आहे'.


यावर हेमा मालिनी यांनी सांगितलं की, "मी एकदा त्यांच्याशी मुलींनी चित्रपटात काम करण्याबद्दल चर्चा केली होती. पण त्यांनी अजिबात नाही असं सांगितलं होतं. मुलींच्या जन्मापासून ते यावर ठाम होते. त्यांनी डान्स किंवा इतर गोष्टी शिकाव्यात, पण चित्रपटात येऊ नये".


इशाने पुढे सांगितलं की, "ते आमच्या बाबतीत फार पझेसिव्ह आहेत. तुम्ही घरी बसलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. आम्हाला बाहेर जाण्याचीही फार परवानगी नव्हती. पण आई असल्याने मला स्पोर्ट्स किंवा इतर कार्यक्रमांना जात असे. आम्ही क्रीडा स्पर्धांसाठी बाहेर जाण्यावरही त्यांचा आक्षेप होता. ते आमच्याबाबतीत फार सुरक्षित आहेत. आम्ही स्लिव्हलेस टॉप किंवा शॉर्ट पॅट घालण्यालाही त्यांचा विरोध होता. जेव्हा ते घऱी यायचे तेव्हा आम्ही पंजाबी ड्रेस घालायचो".


हेमा यांनी सांगितलं की, “त्यांना आधुनिक कपडे घालायला आवडतात. मी त्यांना काही प्रमाणात ते कपडे घालण्याची परवानगी देते. परंतु त्याच वेळी त्यांनी पारंपारिक पोशाखांमध्ये देखील असणे आवश्यक आहे.”


Hautterfly ला दिलेल्या एका मुलाखतीत, अभिनयाचा प्रयत्न करणाऱ्या इशा देओलने सांगितलं की, “त्यांना मी चित्रपटात काम करु नये असं वाटत होतं. ते पंजाबी असल्याने तशी विचारसरणी होती. मी लग्न करून 18 व्या वर्षी स्थायिक व्हावं अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या कुटुंबातील स्त्रिया त्या पद्धतीने वाढल्या आहेत. पण माझे संगोपन माझ्या घरात खूप वेगळे झाले, माझ्या आईला चित्रपटात काम करताना पाहून आणि तिच्या नृत्याने मला एक दिशा दिली. मला काहीतरी करायचं आहे हे माझ्या मनात रुजलं होतं.”