`प्रत्येक महिलेला...`, हेमा मालिनी यांनीच सांगितलं धर्मेंद्र यांच्यासोबत न राहण्यामागचं कारण
Hema Malini : हेमा मालिनी यांचं आणि धर्मेंद्र यांचं 1980 साली लग्न झालं. तर त्यांच्या लग्नाच्या काही वर्षांनंतर ते वेगळे राहू लगाले तरी देखील हेमा मालिनी यांच्या धर्मेंद्र यांच्याकडून कोणतीही तक्रार नाही असं त्यांनी म्हटलं होतं.
Hema Malini : बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या लग्नाविषयी तर सगळ्यांनाच ठावूक आहे. धर्मेंद्र यांच्यासोबत लग्न करण्याच्या निर्णयावर हेमा मालिनी यांच्या आई-वडिलांचा विरोध होता. कारण त्यांचे पहिले लग्न झाले होते. तर धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीचे नाव प्रकाश कौर असे आहे. लग्नाच्या काही वर्षांनंतर वेगवेगळे राहु लागलेल्या हेमा मालिनी यांना धर्मेंद्र यांच्याकडून कोणतीही तक्रार नाही. त्यातही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्याशी लग्न करण्याआधी प्रकाश कौर यांनी घटस्फोट दिला नव्हता. त्यातही आजही धर्मेंद्र हे त्यांची पहिली पत्नी आणि त्यांच्या कुटुंबासोबत राहतात. दरम्यान, हेमा मालिनी यांनी एका मुलाखतीत त्यांच्या आणि धर्मेंद्र यांच्या नात्यावर वक्तव्य केलं आहे.
हेमा मालिनी यांनी 'लहरें' ला दिलेल्या मुलाखतीत धर्मेंद्र यांच्यासोबतच्या नात्यावर वक्तव्य केलं आहे. त्यासोबत त्यांनी याविषयी सांगितलं आहे की त्यांच्यासोबत न राहता लांब का राहतात. 'कोणालाही असं झालं पाहिजे अशी इच्छा नसते, असं आपोआप होतं आणि जे होतं, त्याला तुम्ही स्विकारावं लागतं. नाहीतर, कोणालाही याची जाणीव होणार नाही की त्यांना त्यांचे आयुष्य कसं जगायचं आहे. एका सर्वसामान्य कुटुंबाप्रमाणे प्रत्येक महिलेला नवरा आणि मुलं हवी असतात, पण कुठे ना कुठे, आपण जसा विचार करतो तशा प्रकारे गोष्टी होत नाही', असं हेमा मालिनी म्हणाल्या.
हेमा मालिनी पुढे म्हणाल्या की, या गोष्टीचं मला वाईट वाटत नाही. मी माझ्यात आनंदी आहे. मला दोनं मुली आहेत, ज्यांना मी खूप चांगले संस्कार देत वाढवलं आहे. त्यातही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धर्मेंद्र हे नेहमीचसोबत होते. दरम्यान, अनेकांना याविषयी माहित नाही की हेमा मालिनी यांची आई जया चक्रवर्ती यांनी त्यांना जितेंद्र यांच्याशी लेकीनं लग्न कराव यासाठी खूप विनंती केली होती. याविषयी हेमा मालिनी यांनी त्यांची बायोग्राफी हेमा मालिनी: बियोन्ड द ड्रीम गर्ल' मध्ये म्हटलं आहे.
हेही वाचा : 'तो पैसे देऊन...'; रणवीर- आलियाचं यश पाहून कंगनाचा तिळपापड, थेट करण जोहरबद्दल हे काय बोलली?
दरम्यान, असे म्हटले जाते की हेमा आणि जितेंद्र हे सीक्रेट लग्न करणार होते. त्यासाठी ते चेन्नईला पोहोचले होते. अशी माहिती मिळाल्यानंतर लगेचच तिथल्या एका स्थानीक वर्तमानपत्रात बातमी दिली. त्यानंतर घाबरलेले धर्मेंद्र आणि जितेंद्र यांची गर्लफ्रेंड शोभा हे चेन्नईला पोहोचले होते. ते समोरासमोर आले आणि अशा प्रकारे त्यांचं लग्न मोडलं. त्यानंतर 1980 साली हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी लग्न केलं.