Hemangi Kavi post : लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी ही तिच्या परखड मतासाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर हेमांगी सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. सोशल मीडियावर हेमांगी तिला जे काही वाटतं ते स्पष्ट बोलताना दिसते. अनेकदा ती ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देताना दिसते. आता हेमांगीनं थेट समाजासाठी घातक असलेल्या लोकांविषयी स्पष्ट मत मांडलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेमांगीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये हेमांगी एक स्क्रिनशॉट शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओवर काही नेटकऱ्यांनी अश्लील कमेंट करण्यास सुरुवात केली होती. खरंतर या व्हिडीओत हेमांगी ही चालताना दिसत असून तिच्या बॅकग्राऊंडला रणबीर कपूरच्या 'ॲनिमल' चित्रपटातील गाणं बॅकग्राऊंडला सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. इतकंच नाही तर ती हा चित्रपट पाचव्यांदा पाहायला जात असल्याचं देखील तिनं त्यात सांगितलं. हा व्हिडीओ शेअर करत हेमांगीनं गाण्याचे बोलचं माझं उत्तर देत आहेत. दरम्यान, हेमांगीच्या या व्हिडीओवर कमेंट करत ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्याच्या पोस्टची हेमांगीनं दखल घेतली आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हेमांगीनं त्या नेटकऱ्याच्या कमेंटचा स्क्रिनशॉर्ट शेअर करत त्यावरून थेट खडे बोल सुनावले आहे. हेमांगी म्हणाली, 'Bio (इन्स्टाग्राम बायो) मध्ये लिहिताना छत्रपती शिवाजी महाराज, गणपती बाप्पा, इंडियन आर्मी आणि प्रत्यक्षात वागतांना?? असली माणसं आतून जनावरच असतात. माणसाचं कातडं घालून समाजात हिंडत असतात!. हे कुठल्याही चित्रपट, नाटकापेक्षा घातक आहे. चित्रपट काल्पनिक असतो पण अशी जनावरं आपल्या आजुबाजूला आहेत, खरीखुरी! वार करतात आणि पकडलेही जात नाहीत. माझ्यासाठी ही हिंसाच आहे". 



हेही वाचा : पहिल्याच चित्रपटात स्टार किड्सनं ओलांडल्या मर्यादा! The Archies मधल्या लिप लॉकचीच चर्चा


त्यातही हेमांगीनं ही पोस्ट शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. काही नेटकऱ्यांनी हेमांगीच्या पोस्टवर कमेंट करत म्हटलं की कुठे आहे कमेंट? त्यानं डिलीट केली वाटतं. त्यावर देखील हेमांगीनं प्रतिक्रिया दिलेली आहे. कॉमेंट्स करणार कुटे दिसत नाही गेलं की काय .. ही कमेंट पाहता हेमांगीनं त्यावर उत्तर दिलं की लाज वाटली त्यांना त्यांच्या कमेंटची. इमबॉक्समध्ये माफी मागितली. हेमांगीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती काही दिवसांपूर्वीच ताली या चित्रपटात दिसली होती.