फोटोज : हिना खानची बॉयफ्रेंडसोबत पूलमध्ये धमालमस्ती
हिना खानचे बॉयफ्रेंडसोबतचे धमाल फोटोज...
मुंबई : बिग बॉस ११ मधून बाहेर पडल्यानंतर हिना खान कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असते. हिनाचा म्युझिक व्हिडिओ, ग्लॅमरस फोटोज किंवा तिचा बॉयफ्रेंड यामुळे ती कायम चर्चेत असते. ईद साजरी केल्यानंतर बॉयफ्रेंड रॉकी आणि फ्रेंड्ससोबत हिना कांदिवलीतील एका रिसॉर्टमध्ये गेली होती. रिसॉर्टमधील तिच्या धमाल मस्तीचे फोटोज समोर आले आहेत.
फक्त बिग बॉसच्या घरातच नाही तर हिनाची मस्ती इथे देखील सुरु आहे.
हिना खान लवकरच एकता कपूरच्या कसोटी जिंदगी की २ या मालिकेत नेगेटीव्ह भूमिकेत दिसेल.
हिना खानने बॉयफ्रेंड रॉकीसोबतचे फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
फोटोत दोघेही पूलमध्ये मस्ती करत आहेत.