मुंबई : टीव्ही मालिकांमध्ये झळकलेला हिना खान हा चेहरा आता बॉलिवूडमध्ये आपली कमाल दाखवण्यास सज्ज झाला आहे. हिना लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे. त्यामुळे ती चर्चेत असताना आता आणखी एक निमित्त मिळालं आहे. ते निमित्त म्हणजे तिच्या बोल्ड फोटोजचं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी हिना खानने सोशल मीडियावर आपले तीन बोल्ड फोटो शेअर केले आहे. या फोटोंमध्ये हिना ब्लॅक नाइटीमध्ये दिसत आहे. अतिशय बोल्ड आणि ग्लॅमरस असा तिचा लूक आहे. 



छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'कसौटी जिंदगी की' मध्ये हिनाने कोमोलिकाची भूमिका साकारली होती. हिनाने कोमोलिका बनून सर्वांची मन जिंकली होती. जुन्या कोमोलिकाला विसरायला हिनाने प्रेक्षकांना भाग पाडलं. 




पण असं झाल्यावर हिना ही मालिका सोडणार असल्याची बातमी समोर आली. हिना मालिका सोडत असल्यामुळे चाहते नाराज झाले. पण हिना सिनेमात डेब्यू करण्यासाठी मालिका सोडत असल्याचं समोर आहे. हिना विक्रम भटच्या सिनेमात लवकरच झळकणार आहे. या सिनेमात हिना फॅशन डिझाइनरची भूमिका साकारत आहे.