Hina Khan : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री हिना खान ही बऱ्याच दिवसांपासून ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देत आहे. काही दिवसांपूर्वीच तिला याविषयी कळालं होतं. त्यावर सध्या ती उपचार घेत आहे. तर हिना खानला थर्ड स्टेजचा ब्रेस्ट कॅन्सर आहे. कॅन्सरसारख्या आजाराविषयी कळताच कोणालाही धक्का बसतो आणि त्याप्रमाणे हिनासोबत झालं असेल. इतकंच नाही तर लोकांसाठी ती एक प्रेरणा देखील ठरत आहे. इतकंच नाही तर ती लोकांना जागरुक करण्याचा देखील निर्णय घेत आहे. पण असं वाटतं की आता तिला हा त्रास सहण न होण्यासारखा झाला आहे. याविषयी तिनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिना खाननं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. हिना खानच्या या क्रिप्टिक पोस्टनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. कारण त्यातून तिला किती त्रास होत असेल याची जाणीव होतेय. तिनं या पोस्टमध्ये म्हटलं आहे की 'अल्लाह शिवाय तुम्हाला होणारा त्रास किंवा दुःख कोणीही दूर करू शकत नाही. कृपया अल्लाह, कृपया.' त्यासोबत हिनानं एक भावूक झालेलं इमोशी शेअर करत प्रार्थना करत असल्याचं दाखवत हात दाखवले आहेत.



हिनानं काही दिवसांपूर्वीच सांगितलं की तिला कॅन्सरविषयी कसं माहित झालं. 36 वर्षांच्या हिनानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर करत सांगितलं की ती सतत आजारी पडू लागली होती, इतकंच नाही तर तिला सतत ताप यायचा. जेव्हा ती डॉक्टरकडे गेली तेव्हा त्यांनी तिला कॅन्सरची टेस्ट करण्याचा सल्ला दिला. हे ऐकल्यानंतर हिनाला मोठा धक्का बसला. पण तिनं कसं तरी स्वत: ला सांभाळलं. तिच्या आईकडून तिची ही अवस्था पाहिली जात नव्हती. तिच्या आईला हे जेव्हा कळलं तेव्हा ती रडू लागली होती आणि लेकीसाठी प्रार्थना करू लागली होती. 


हिना खानची पोस्ट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी आणि चाहत्यांनी तिच्यासाठी प्रार्थना करत असल्याचं सांगितलं. इतकंच नाही तर अनेकांनी ज्यांना कॅन्सर झाला होता. त्यांनी हिनाला काही टिप्स दिल्या ज्यानं तिला मदत होऊ शकते. 


हेही वाचा : लग्नाच्या दिवशी सोनाक्षीच्या पतीसाठी शाहरुख खानची 'ही' कृती ठरली खास


दरम्यान, हिनाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिनं 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून अक्षरा ही भूमिका साकारली होती. त्या भूमिकेसाठी तिला आजही लोकं ओळखतात. तिनं अनेक वेब सीरिज आणि म्यूजिक व्हिडीओमध्ये काम केलं आहे.