हिंदी सैराट धडकची शुटिंग सुरू
ईशान आणि जान्हवी मागील अनेक दिवसापासून आपल्या सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त होते.
मुंबई : सैराट मराठीत हिट झाल्यानंतर सैराट हिंदीत येणार आहे, हिंदी सैराट सिनेमाचं नाव, धडक असणार आहे. धडक सिनेमाचं पहिलं शेड्यूल पूर्ण झालं आहे.
हिंदी सैराट सिनेमाचं पहिलं शेड्यूल पूर्ण
यात श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आर्चीची भूमिका साकारत आहे, तर शाहीद कपूरचा भाऊ ईशान खट्टर हा पर्शाची भूमिका साकारतोय.
अनेक फोटो व्हायरल
ईशान आणि जान्हवी मागील अनेक दिवसापासून आपल्या सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त होते. शुटिंगच्या सेटवरील अनेक फोटो समोर आले आहेत.
आर्ची-पर्शानंतर आता
या सिनेमात जान्हवी कपूरचं नाव परी असणार आहे, तर इशान खट्टरचं नाव मधूक असं असेल. मराठीत रिंकू राजगुरूचं आर्ची होतं, तर आकाश ठोसरचं नाव पर्शा होतं.
'धडक'कडे सर्वांची नजर
मराठीतील सैराट सिनेमा भरभरून चालला, त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर, या सिनेमाचे राईटस करन जोहरने घेतले होते. शशांक खेतान या सिनेमाचं दिग्दर्शन करीत आहेत, करन जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली हा सिनेमा बनवला जात आहे.