`सुधर जा बेटा..वरना मैं`, हिंदुस्तानी भाऊच्या धमकीवर उर्फी जावेदचा पलटवार
उर्फीला सुधरण्याची धमकी देणं हिंदुस्तानी भाऊला पडलं महागात... पाहा व्हिडीओ
Urfi Javed and Hindustani bhau : उर्फी जावेद कायम तिच्या विचित्र करपड्यांमुळे चर्चेत असते. हटके प्रकारे डिझाईन केलेले कपडे आणि तिचा फॅशन सेन्स (urfi fashion sense) सोशल मीडियावर चर्चेत असतो. पण उर्फीला तिच्या विचित्र ड्रेसिंग स्टाईलमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. सोशल मीडियावर अनेक जण तिच्या फोटो आणि व्हिडीओ कमेंट करत विविध सल्ले देत असतात. आता ‘बिग बॉस’ फेम ‘हिंदुस्तानी भाऊ’ (Hindustani Bhau) ने देखील यामध्ये उडी घेतली आहे.
हिंदुस्तानी भाऊने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये हिंदुस्तानी भाऊ म्हणतो, 'जय हिंद... हा मेसेज उर्फी जावेदसाठी आहे. जी स्वतःला प्रसिद्ध फॅशन डिझायनर समजत आहे. जे कपडे घालून तू बाहेर फिरत आहेस, त्यामुळे बहिणी आणि मुलींपर्यंत एक वेगळा मेसेज पोहोचत आहे. तु जे करत आहेस ती आपली हिंदू संस्कृती नाही....'
पुढे हिंदूस्ताना भाऊ म्हणाला, 'मी प्रेमाने सांगात आहे त्यामुळे सुधार नाहीतर मी सुधारेल... एका भावाच्या नात्याने प्रेमाने सांगत आहे. त्यामुळे सुधार...' सध्या हिंदूस्तानी भाऊने व्हिडीओच्या माध्यमातून उर्फीला दिलेली धमकी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हिंदूस्ताना भाऊने दिलेल्या धमकीवर उर्फीचा पलटवार
उर्फी म्हणाली, 'तु जे करत आहेत ती भारताची संस्कृती आहे का. तुझ्या शिव्यांनी किती लोकं सुधारली आहेत. मला फक्त सुधारायलाच नाही तर, बिघडवायला देखील येतं. आता तु मला धमक्या देत आहेस. मी तुला तुरुंगातही पोहोचवू शकते. पण याआधी देखील तू अनेकदा तुरुंगात गेला आहेस. असं उर्फी म्हणाली.
पुढे हिंदूस्तानी भाऊला बजावत उर्फी म्हणाली, 'तुरुंगात जाणं चांगला मेसेज आहे का. सर्वांसमोर मुलींना धमकावने चांगला मेसेस आहे. मित्रांनो याला काही एक फरक पडत नाही. त्याला फक्त आणि फक्त प्रसिद्धी हवी आहे. काही दिवसांपूर्वी माझी मदत करुन प्रसिद्धी मिळवण्याच्या प्रयत्नान होता. पण मी त्याला नकार दिला...'
'हे सत्य आहे की इंटरनेटवर मला प्रत्येक जण धमकी देत आहे, मला मारण्याची इच्छा अनेकांच्या मनात आहे. अशा लोकांनी मी घाबरत नाही. पण मला माझ्या सुरक्षेची चिंता आहे. जरी त्यांनी काही केलं नाही तरी त्यांच्या विचारांनी प्रभावित होवून इतर लोक मला नुकसान पोहोचवू शकतात....' असं देखील उर्फी म्हणाली.