Holi Special : Ranbir-Deepika नं `बलम पिचकारी`च्या वेळी घेतली भांग आणि पुढे...
Bollywood Holi Song Bala Pichkari : सर्वत्र रंगांची उधळण करताना बलम पिचकारी हे गाणं वाजतं आहे. रणबीर आणि दीपिकाचं हे गाणं प्रत्येक होळीला लागतं. पण तुम्हाला माहिती आहे का, या गाण्याचा शूटिंगच्या वेळी रणबीर आणि दीपिकाने भंग घेतली आणि मग..
Balam Pichkari Song Video : देश रंगमय (holi 2023) झाला आहे. सर्वत्र रंगांची उधळण (Dhulivandan 2023) सुरु अशातच बॉलिवूडमधील गाण्यावर (bollywood holi song) सगळे ताल धरतात. त्यातील एक गाणं कायम लागलतं ते म्हणजे बलम पिचकारी...रणबीर आणि दीपिकाचं हे गाणं...सध्या रणबीर कपूर त्याचा आगामी सिनेमासाठी उत्सुक आहे. 'तू झुठी मैं मक्का' (Tu Jhoothi Main Makkaar) रिलीजसाठी सज्ज आहे. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अनेक किस्से असतात. रणबीर आणि दीपिकाच्या बलम पिचकारी गाण्याचं शूटिंग सुरु असताना असाच एक मजेदार किस्सा घडला ज्याबद्दल तुम्ही कधी ऐकलं नसेल. या गाण्यावेळी रणबीर आणि दीपिकाने भंगा (bhang) घेतली आणि मग पुढे काय झालं, चला जाणून घेऊयात. (holi 2023 bollywood holi song balam pichkari ranbir kapoor deepika padukone video)
भांग घेतली अन् मग...
रणबीर कपूर (ranbir kapoor ), दीपिका पदुकोण (deepika padukone), कल्की कोचलिन (Kalki Koechlin) आणि आदित्य कपूर (Aditya Kapoor) यांच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे. होळीवरील हे गाणं आजही अनेक ठिकाणी लावलं जातं. या गाण्यात कलाकार जोरदार होळीचे रंग खेळताना दिसतं आहेत. पण तुम्हाला या मस्तीमागचं रहस्य ऐकून तुम्ही अवाक् व्हाल. या किस्सेबद्दल खुद्द रणबीर कपूर याने सांगितलं आहे. तो म्हणाला की, या गाण्याच्या शूटिंगच्या वेळी त्याने दीपिका पदुकोण, कल्की कोचलिन आणि आदित्य कपूर यांनी थोडीशी भांग घेतली होती.
अजून एक मजेदार किस्सा
या गाण्याशीसंबंधित अजून एक किस्सा आहे. या गाण्यासाठी एक मोठी पाण्याची टाकी बनवण्यात आली होती. याबद्दल दीपिका आणि कल्की यांना काहीच माहिती नव्हतं. पण रणबीर आणि आदित्यला याबद्दल माहिती होती. तेव्हा या दोघा अभिनेत्यांनी दीपिका कल्कीसोबत मजा केली. जेव्हा दोन्ही अभिनेत्री शूटसाठी तयार होऊ आल्या त्यावेळी आदित्य आणि रणबीरने त्यांना उचललं आणि पाण्याचा टाकीत फिकले.
हे सगळं दृश्यं कोरिओग्राफर रेमो डिसूझा कॅमेऱ्यात कैद केलं. जे नंतर गाण्यात वापण्यात आलं. त्यामुळे हे गाणे इतके हिट झाले की आजही या गाण्याशिवाय होळीची पार्टी अपूर्ण आहे.