Hollywood Strike : हॉलिवूड कलाकारांनी गुरुवारी संप पुकाराला आहे. त्यांनी काल 13 जुलै रोजी याविषयी माहिती दिली की 14 जुलै रोजी ते हा संप पुकारणार आहेत. कलाकारांनी हा संप त्यांच्यासाठी नाही तर चित्रपटसृष्टीतील लेखकांसाठी केला आहे. त्यात 63 वर्षांनंतर पहिल्यांदा असा संप पुकारण्यात आला आहे. तीन महिन्यांपूर्वी कमी वेतन आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे उद्भवलेल्या धोक्यामुळे लेखकांनी काम करणं बंद केलं होतं. आता त्यांच्या संपामध्ये हजारो चित्रपट आणि टेलिव्हिजन कलाकाही सहभागी झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

द स्क्रीन अॅक्टर्स गिल्ड (एसएजी-एएफटीआरए) मधील ए-लिस्ट कलाकारांसह 1 लाख 60 हजार कलाकार लेखकांना पाठिंबा देत पुढे आले आहेत. हा संप मध्यरात्री सुरु झाला आहे. त्यांनी हा संप ही कमी वेतन आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे उद्भवलेल्या धोक्याला पाहता करण्यात आला आहे. खरंतर स्ट्रीमिंगची वाढती मागणी आणि कोरोनामुळे उद्भवलेल्या अडचणींमुळे स्टुडियोवर मोठा दबाव आला आहे, त्यापैकी कोणाला पैशांचा प्रॉबलम आहे. त्यासोबतच कलाकार आणि लेखक एकदम अचानक आणि पटकन बदलत आहेत. त्यामुळे ते चांगलं मानधन आणि त्यांना प्रोजेक्टमधून काढू टाकणार नाही ही सिक्योरिटी हवी यासाठी हा संप करत आहेत. 



ए-लिस्ट कलाकारांनी गेल्या महिन्यात गिल्ड लीडरशिपवर एका पत्रावर साइन केली आणि ते म्हणाले की ते संपावर जाण्यास तयार आहेत. त्यांनी या घटनेला "आमच्या क्षेत्रात एक अभूतपूर्ण बदल करण्याची वेळ", असं म्हटलं आहे.


हेही वाचा : Gadar मधील 4 कलाकार काळाच्या पडद्याआड, तर 'हे' 17 कलाकार आता असे दिसतात...


कलाकार संपात सहभागी झाल्याने अमेरिकेतील सर्व चित्रपट आणि स्क्रिप्टेड टेलिव्हिजन शोची निर्मिती थांबेल. ज्यांचे स्वतंत्र प्रॉडक्शन आहेत आणि जे युनीयन लेबर अॅग्रीमेंटमध्ये समाविष्ट नाहीत त्यांचं काम सुरू राहील. या संपामुळे ‘स्ट्रेंजर थिंग्ज’, ‘द हँडमेड्स टेल’ सारख्या लोकप्रिय मालिकांचं शुटिंग थांबलं आहे. संप असाच सुरू राहिल्यास अनेक चित्रपट देखील पुढे ढकलले जाऊ शकतात. तर गुरुवारी मध्य रात्री सुरु झालेल्या या संपाविषयी बोलायचे झाले तर कलाकार 1960 नंतर पहिल्यांदा हॉलिवूड 'डबल स्ट्राइक' मध्ये लेखकांसोबत संपात जोडले आहेत.