लोकप्रिय विनोदी अभिनेत्याचं निधन; हॉटेलमध्ये संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह
मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळल्यामुळं एकच खळबळ
मुंबई : सध्या कला जगतामध्ये एका अभिनेत्याच्या निधनानं एकच खळबळ माजली आहे. अचानकच अभिनेत्याच्या निधनाचं वृत्त समोर आल्यामुळं चाहत्यांना धक्का बसला आहे. हॉटेलमध्ये निधन पावलेल्या अभिनेत्याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळल्यामुळं एकच खळबळ माजली आहे.
बॉब सगेट ( Bob Saget)असं या विनोदी अभिनेत्याचं नाव. सूत्रांच्या माहितीनुसार रविवारी रात्रीच त्याचं निधन झालं.
फ्लोरिडातील एका हॉटेलच्या खोलीत त्यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला. पण, त्यांच्या मृत्यूचं कारण मात्र अद्यापही समोर आलेलं नाही.
65 वर्षीय बॉब यांच्या निधनाचं कारण सध्या शोधण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे.
बॉब यांच्या निधनाचं वृत्त कळताच हॉलिवूड विश्वातूनही शोक व्यक्त करण्यात येत आहे.
असं म्हटलं जात आहे की रविवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास बॉब सगेट यांचा मृतदेह हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना आढळला.
लगेचच त्यांच्या खोलीमध्ये संशयास्पद गोष्टींचा शोध घेण्यात आला. पण, हाती काहीही लागलं नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार 4 हेर त्या ठिकाणी दाख झाले, ज्यांनी बॉब यांना मृत घोषित केलं. त्यांच्या मृतदेहाशेजारी ड्रग्ज अथवा इतर कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.