मुंबई : कास्टिंग काऊच, Me too अशा अनेक गोष्टींअंतर्गत बऱ्याच महिलांनी धक्कादायक खुलासे केले आहेत. ज्यात आता पुन्हा नव्याने भर पडली आहे. चर्चा होतेय ती म्हणजे अभिनेता क्रिस नॉथ याच्या नावाची. ज्याच्यावर दोन महिलांनी लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही प्रकरणं 2004 आणि 2015 मधील असल्याची माहिती समोर आली आहे. एका मासिकाला माहिती देत असताना त्यांनी याबाबतचा खुलासा केला.


दोन्ही महिला एकमेकिंना ओळखतही नाहीत. दरम्यान, क्रिसच्या म्हणण्यानुसार या महिलांनी त्यांच्या सहमतीनंच संबंध होते. पण, आता मात्र त्या महिला आपल्यावर चुकीचे आरोप लावत आहेत असं अभिनेत्याचं म्हणणं आहे. 


एका 40 वर्षीय महिलेनुसार ही घटना 2004 मधील आहे. ज्यावेळी क्रिस नॉथने वेस्ट हॉलिवूडमध्ये एक अपार्टमेंट खरेदी केलं होतं तेव्हा अभिनेत्यानं तिच्यावर बलात्कार केला होता. 


महिलेचं वय त्यावेळी 22 वर्षे इतकं होतं. तर, दुसऱ्या 31 वर्षी महिलेनं या अभिनेत्यानं आपल्यावर 2015 मध्ये बलात्कार केल्याचा आरोप केला. 


त्यावेळी अभिनेता 60 वर्षांचा आणि ही महिला 25 वर्षांची होती. सदर महिलांनी केलेल्या आरोपांबाबत काही निकटवर्तीयांनी या घटनांना दुजोरा दिला. 


सध्या अभिनेता क्रिस नॉथ आणि या महिलांमध्ये झालेल्या टेक्स्ट मेसेजचाही उल्लेख मासिकातील लेखामध्ये करण्यात आला आहे. 


‘लॉ एंड ऑर्डर’ (Law & Order) आणि ‘सेक्स एंड द सिटी’ (Sex and the city) अशा चित्रपटांमध्ये झळकलेल्या या अभिनेत्यानं त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप फेटाळले आहेत.  


'माझ्यावर त्यांनी आरोप केले आहेत ज्यांना मी दहा वर्षांपूर्वी भेटलो होते. हे आरोप पूर्णपणे खोटे आहेत. ही कथा आता 30 वर्षे किंवा 3 दिवसांपूर्वीचीही असू शकते.' असं तो म्हणाला. 


मी मर्यादा ओलांडत नाही, या प्रकरणामध्ये जे काही झालं ते परस्पर सहमतीनंच होतं, असं या अभिनेत्यानं स्पष्ट केलं.