Oscars2020 : आमच्यासारखे आम्हीच.... ; अतरंगी लूकमध्ये गायक चमकला
पाहा त्याचं हे रुप पाहून काय म्हणाले नेटकरी
मुंबई : एखाद्या पुरस्कार सोहळ्याच्या वेळी त्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक सेलिब्रिटीच्या स्टाईल स्टेमेंटवर आणि चौकटीबाहरेच्या लूकवर अनेक नजरा खिळतात. त्यातही ऑस्कर पुरस्कार सोहळा म्हटलं की, नवनवीन संकल्पनांच्या परिसीमाच ओलांडल्या जातात. यंदाच्या वर्षी अशाच लूकमध्ये पाहायला मिळाला तो म्हणजे अमेरिकन अभिनेता, गायक बिली पोर्टर Billy Porter. मागील वर्षीप्रमाणेच यंदाही बिली रेड कार्पेटवर आला आणि कॅमेऱ्यासह चाहत्यांची नजर त्याच्याकडे वळली.
जणू काही एखादा सुवर्णुपंखी पक्षीच रेड कार्पेटवर आला असावा असाच लूक त्याने केला होता. पक्ष्याच्या पिसांप्रमाणे सोनेरी रंगाच्या एका टॉपला बिलीने पीच रंगांच्या विविध छटा असणाऱ्या पायघोळ स्कर्टची जोड दिली होती. अतिशय आत्मविश्वासाने तो Oscars2020च्या रेड कार्पेटवर आला.
बस्स.... मग काय, बिली येताच आमच्यासारखे आम्हीच.... असाच भाव त्याच्या चेहऱ्यावर होता. कमालीच्या आत्मविश्वासाने त्याने हा लूकही कॅरी केला होता. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत बिलीने चाहत्यांना आपल्या लूकची झलक दाखवली. जे पाहून त्याच्या फॅशन सेन्सची आणि या लूकची प्रशंसा केली.
Oscars 2020 : ऑस्कर पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
मागील वर्षीसुद्धा तो अशाच काहीशा लूकमध्ये ऑस्करसाठी आला होता. तेव्हा कोणा एका अभिनेत्रीपेक्षा बिलीच्याच पोषाखाची सर्वदूर चर्चा झाली होती. यंदाच्या वर्षी फक्त ऑस्करच नव्हे, तर गोल्डन ग्लोब्स, क्रिटीक्स चॉईस अवॉर्ड्स आणि ग्रॅमी पुरस्कारांमध्येही बिली पोर्टरने त्याचं वेगळेपण दाखवून दिलं होतं.