आशा भोसलेंकडे आला International पाहुणा; जेवणातल्या `या` पदार्थानं जिंकलं त्याचं मन
पाहा तो पाहुणा आहे तरी कोण...
मुंबई : सेलिब्रिटी वर्तुळामध्य़े गणल्या जाणाऱ्या काही दिग्गज नावांमध्ये ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांच्याही नावाचा समावेश होतो. वयाचा आकडा वाढत असला तरीही आशा भोसले यांचा जगण्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन मात्र या आकड्यानुसार वयोवृद्ध होत नाहीय. उलटपक्षी दर दिवशी त्या इतरांनाच जगण्यासाठी प्रेरणा देत असतात. अशा या आशा भोसले यांच्याकडे म्हणे एका मोठ्या सेलिब्रिटीनं पाहुणचार घेतला.
हा पाहुणचार होता, आशा भोसले यांच्या बर्मिंघम येथील हॉटेलमध्ये आलेल्या हॉलिवूड मेगास्टार टॉम क्रुज याचा. ‘मिशन: इम्पॉसिबल 7' च्या चित्रीकरणादरम्यानच टॉमनं वेळ काढत आशा भोसले यांच्या Asha`s या हॉटेलला भेट दिली. इथं त्यानं चिकन टिक्काही खाल्ला. या पदार्थाची चव टॉमला इतकी आवडली की, त्यानं दोनदा हा पदार्थ मागवल्याचं सूत्रांनी सांगितलं.
टॉम क्रुज आपल्या हॉटेलमध्ये आल्याची माहिती मिळताच आशा भोसले यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती देत आपला आनंद व्यक्त केला. आंतरराष्ट्री पातळीवर प्रसिद्ध असणाऱ्या एका सेलिब्रिटीनं आपल्या हॉटेलला भेट देणं आणि तिथं येऊन भारतीय पदार्थाचा आस्वाद घेणं याचा आनंद व्यक्त करताच चाहत्यांनी आशा भोसले यांच्या आनंदात सामील होत त्यांच्या पोस्टवर कमेंट केल्या.